Fact Check Of Old Vyang Chitra Newspaper Article : लाईटहाऊस जर्नलिझममला एका वर्तमानपत्राचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आले. त्या फोटोमध्ये बातमीचे मुख्य शीर्षक (हेडलाइन) अधोरेखित (हायलाईट) करण्यात आली आहे. ‘२५८८ वर्षांनंतर होळीच्या दिवशी असा योग बनणार आहे ज्याने अनेक आजार बरे होतील’ ; अशी व्हायरल होणाऱ्या वर्तमानपत्रातील हेडलाइन आहे.
पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, तो २०१९ मध्ये लिहिलेला एक व्यंगात्मक (व्यंगचित्र) लेख आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर @kapildhama कपिल धामा यांनी व्हायरल वर्तमानपत्राचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, असे योगायोग सत्ययुगातील लोकांच्या नशिबीही आले नसतील.
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह वर्तमानपत्राचा फोटो शेअर करीत आहेत.
https://www.facebook.com/share/p/1PxgWm74Sy
https://www.facebook.com/share/p/1J8rGWa8a7
https://www.facebook.com/share/p/15JaZYkmUj
तपास :
पोस्टवरील कमेंट्सवरून असे दिसून आले की, युजर्सनी संपूर्ण मजकूर न वाचता फक्त मुख्य शीर्षक वाचले. पण, तुम्ही जर मजकूर वाचलात, तर तुम्हाला असे दिसून येईल की, ते एक व्यंगचित्र होते.
एका छोट्या रिव्हर्स इमेज सर्चवरून आम्हाला मूळ लेख मिळाला, जो १९ मार्च २०१९ रोजी prabhatkhabar.com वर प्रकाशित झाला होता.
मजकुरात लिहिले होते…
जर व्यवसायात मंदी असेल, तुम्हाला कामावर जायची इच्छा नसेल, कुठेही बाहेर जायला वाटत नसेल, मुले अभ्यास करीत नसतील, त्यांना कमी गुण मिळत असतील, तुम्हाला डोकेदुखी असेल, तुम्हाला जेवायला आवडत नसेल, रात्री वारंवार जाग येत असले, तुमचे शरीर दुखत असेल, तुमचे डोळे दुखत असतील, तुम्हाला आळस वाटत असेल, तर हा टोटका या सर्व आजारांवर खात्रीलायक इलाज आहे.
होळीच्या एक दिवस आधी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी होलिका दहन केले जाते. तर युक्ती अशी आहे की, जेव्हा होलिका दहन होईल तेव्हा मोबाईल तुमच्या डोक्यावरून सात वेळा फिरवा आणि तो होलिकेच्या अग्नीत टाका आणि मागे वळून पाहू नका. एक-दोन दिवस तुम्हाला नक्कीच त्रास होईल, मळमळ होईल, राग येईल; पण तुम्हाला सर्व आजारांपासून आराम मिळेल आणि सर्व काम व्यवस्थित होऊ लागेल. प्रयत्न करा. सर्वांना, होळीच्या शुभेच्छा!
त्यामुळे मजूकर वाचल्यावर ते एक व्यंगचित्र होते, जे लोकांनी फक्त मुख्य शीर्षक वाचल्यानंतर शेअर केले हे स्पष्ट होत आहे.
निष्कर्ष :
वर्तमानपत्राचा फोटो चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात आला आहे. बातमी खरी असली तरीही व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. कारण- हे जुने आणि व्यंगचित्र आहे, असे स्पष्ट झाले आहे.