Fact check Of Bangkok Earthquake Video : काही दिवसांपूर्वी म्यानमार आणि थायलंड बँकॉकमध्ये शुक्रवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या भूकंपामुळे अनेक नागरिकांची हानी झाल्याचेही दिसून येत आहे. अनेक शेजारील देश हादरले आणि एक इमारत कोसळून किमान १८ जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. तर याचदरम्यान लाईटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ सापडला, जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये इमारतींना धडकणाऱ्या त्सुनामीसारख्या मोठ्या लाटा दाखवल्या गेल्या होत्या. पण, आमच्या तपासादरम्यान वेगळेच सत्य समोर आले आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर लाभू राम गर्गने त्यांच्या (एक्स) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. समुद्रातून भल्यामोठ्या लाटा इमारतींवर आदळताना दिसत आहेत. तसेच ‘बँकॉकमधील भूकंपाचा हृदयद्रावक व्हिडीओ #earthquake’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

https://www.facebook.com/bulatbaba.bulit/videos/522445080623595

तपास :

मग आम्ही इनव्हिड टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि कीफ्रेम्स मिळवून तपास सुरू केला. आम्ही कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्या आणि आम्हाला इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला एक व्हिडीओ सापडला.

https://www.instagram.com/stat.us.ai/reel/DEjEXRbPhlU

हा व्हिडीओ ८ जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला होता, कॅप्शनमध्ये लिहिले होते : इटलीच्या किनाऱ्यावर ज्वालामुखीचा उद्रेक.

व्हिडीओवरील कमेंटमध्ये असे म्हटले होते की, शेअर केलेला व्हिडीओ एआय-जनरेटेड आहे.

stat.us.ai या इन्स्टाग्राम हँडलचे ६,१३,००० फॉलोअर्स होते आणि बायोमध्ये असे म्हटले आहे की, हे प्रोफाइल व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्ट चालवीत आहे, जो AI वापरून भविष्याला आकार देतो. तुमच्यासाठी तो व्हायरल व्हिडीओ बनवीत आहे.

आम्हाला फेसबुक आणि एक्स (ट्विटर)वरदेखील हे पेज सापडले.

https://www.facebook.com/profile.php?id=61570526611897&sk=reels_tab

https://www.facebook.com/reel/1359979628778688

आम्ही एआय इमेज डिटेक्टरद्वारे कीफ्रेम्सदेखील चालवल्या आणि तेव्हा आढळले की, फोटो एआय इनपुट दर्शवते.

निष्कर्ष : अलीकडच्या बँकॉक भूकंपाचा असल्याचा दावा केलेला व्हायरल व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) तयार करण्यात आला आहे. त्यामुळे व्हायरल होणारा दावा आणि व्हिडीओ बनावट आहेत