Fact check Of China Chinas Lantern Festival Video : रंगांचा उत्साही सण होळी हा हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो. अशातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. असा दावा केला जात आहे की, चीनमध्ये होळी साजरी केली जात आहे. पण, तपासादरम्यान, आम्हाला आढळले की, व्हिडीओमध्ये चीनचा कंदील उत्सव म्हणजेच लँटर्न फेस्टिवल सुरू आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजरने @Hindustan_Meri1 दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला जात आहे आणि ‘चीनमध्ये राहणारे भारतीय अशा प्रकारे होळी साजरी करतात’, अशी कॅप्शन दिली आहे.
https://twitter.com/HPhobiaWatch/status/1900077561314763255
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्ही पोस्टवरील कमेंट्स वाचून तपास सुरू केला.
अनेक कमेंट्समध्ये हा व्हिडीओ चिनी लँटर्न फेस्टिवलमधील असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला.
पाच दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला असाच एक व्हिडीओ आम्हाला सापडला.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, हा व्हिडीओ चीनमधील चाओझोऊ शहरातील वसंत महोत्सवातील आहे.
हा व्हिडीओ तीन आठवड्यांपूर्वी यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला होता.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, नमस्कार मित्रांनो, मी चीनमधील शियाओ एन ट्रॅव्हल्स आहे. मी एक स्वयं-मीडिया प्रॅक्टिशनर आहे.
सबस्क्रिप्शन लिंक : माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करण्यासाठी आपले स्वागत आहे! #प्रवास #प्राचीन वास्तुकला #मानवता आणि इतिहास
त्याच्या प्रोफाइलवर शेअर केलेले व्हिडीओ चीनमधील आहेत.
आम्हाला टिकटॉकवरदेखील असाच व्हिडीओ पोस्ट केलेला आढळला. व्हिडीओवरील मजकुरात म्हटले आहे, ‘नवीन वर्षाचा १५ वा दिवस’.
आम्हाला हा व्हिडीओ douyin.com वर सापडला.
https://www.douyin.com/video/7471142381585190201
कॅप्शनमध्ये म्हटले आहे : #Chaoshan customs, peace and good luck#Chaoshan Yinglaoye
हा व्हिडीओ १३ फेब्रुवारी रोजी ‘न्यूज डेली न्यूज’ (चिनी भाषेतून भाषांतरित)च्या फेसबुक पेजवरदेखील पोस्ट करण्यात आला होता.
https://www.facebook.com/watch/?v=649696844069599
कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, Chaoshan ओल्ड स्ट्रीट कंदील महोत्सव साजरा होत आहे.
निष्कर्ष : चीनमधील कंदील महोत्सवाचा एक व्हिडीओ चीनमध्ये होळीचा सण साजरा करणाऱ्या भारतीयांचा आहे, असे म्हणून खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.