Fact Check Of Misleading Nagpur Violence Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होणारा एक व्हिडीओ आढळला. व्हिडीओमध्ये प्रचंड गर्दी दिसते आहे आणि मराठे नागपूरकडे मोर्चा घेऊन येत असल्याचा दावा करीत आहेत. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला जातो आहे. तपासादरम्यान आम्हाला हा व्हिडीओ नागपूरचा नाही, असे आढळले.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर नंदिनी इदनानी यांनी तिच्या प्रोफाईलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये डोक्यावर पांढरी टोपी आणि हातात भगवे झेंडे घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत. तसेच ‘ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव. जय भवानी जय शिवाजी’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.

इतर युजर अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत…

तपास :

व्हायरल व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.

आम्हाला यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये असेच व्हिज्युअल्स आढळले.

आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या व्हिज्युअल्सवर एकाच वेळी रिव्हर्स इमेज सर्चदेखील केला.

सर्च केल्यामुळे @shree_shivpratisthan_yenpe च्या इन्स्टाग्राम हँडलवर अपलोड केलेल्या व्हिडीओपर्यंत आम्ही पोहोचलो.

पण, हा व्हिडीओ १२ फेब्रुवारी रोजी अपलोड करण्यात आला होता आणि १७ मार्च २०२५ रोजी नागपूरमध्ये दंगल झाली होती. तसेच ‘हिंदुस्थानची राखीव फौज’ #mohim2025 #guruji #bhide_guruji #hindu #hindusherboy #jayshreeram #jayshivray #dharmveer अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली होती.

आम्हाला दुसऱ्या इन्स्टाग्राम चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओदेखील आढळला.

व्हिडीओला कॅप्शन दिली होती की, ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धारातीर्थ गडकोट मोहीम २०२५’.

त्यानंतर आम्ही गूगल कीवर्ड शोध घेतला आणि त्याबद्दल अनेक बातम्या आढळल्या.

https://pudhari.news/maharashtra/raigad/chhatrapati-shivarayas-32-mana-throne-will-be-erected-on-raigad-fort

https://marathi.abplive.com/photo-gallery/news/raigad-raigad-sambhaji-bhide-guruji-shivpratishthan-hindustan-dharatirtha-mohim-programme-photo-marathi-news-1343795

एबीपी माझावर पोस्ट केलेल्या व्हिडीओ न्यूज रिपोर्टमध्येही आम्हाला असेच दृश्य आढळले.

निष्कर्ष :

संभाजी भिडेगुरुजी यांनी घेतलेल्या ‘धारातीर्थ गडकोट मोहीम’ (किल्ला मोहीम)चा व्हिडीओ नागपूरशी जोडून दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला जात आहे. पण, हा व्हिडीओ जुना आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.