Fact Check Of Viral Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २५ सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये शिक्षक एका विद्यार्थ्याला मारहाण करताना दिसत आहे. भारतीय सोशल मीडिया युजर्सनी हा व्हिडीओ भारतातील असल्याचे समजून उत्तर प्रदेश पोलिसांनाही टॅग केले आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ (Video) भारतातील नसून ट्युनिशियाचा आहे.
तर नक्की काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर @ranasujeetsing राणा सुजित सिंह यांनी व्हायरल दाव्यासह एक व्हिडीओ शेअर केला. तसेच ‘हे बदमाश जास्त फी (शुल्क) घेतात आणि मुलांशी गैरवर्तन करतात’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे आणि उत्तर प्रदेश पोलिसांनाही टॅग केले आहे.
https://twitter.com/ranasujeetsing/status/1897653827379360051
इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ (Video) शेअर करीत आहेत.
https://twitter.com/ashish_pan80266/status/1897588886576243042
https://twitter.com/Pritamkrbauddh/status/1897308598981812539
https://twitter.com/VishalDeep5151/status/1897869728439206068
तपास :
तर आम्ही इनव्हिड टूलवर व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला आणि व्हिडीओचे काही स्क्रीनशॉट काढले.
त्यानंतर आम्ही व्हिडीओमध्ये मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला.
आम्हाला एका अरबी न्यूज वेबसाइटवर स्क्रीनशॉट सापडला.
अहवालात म्हटले आहे : सोसे येथे राहणाऱ्या एका नागरिकाने पुष्टी केली की, सुसेच्या तिफाला प्रदेशातील एका प्राथमिक शाळेतील वर्गात एका १० वर्षांच्या मुलाला संपूर्ण वर्गासमोर त्याच्या शिक्षकाने मारहाण केली.
आम्हाला tunisnow.tn वर पोस्ट केलेली पोस्टदेखील आढळली.
https://www.tunisnow.tn/%D8%B4%D8%A7%D9%87%D8%AF-%D8%A7%D9%84%D9%81%D9%8A%D8%AF%D9%88-%D9%85%D8%B9%D9%84%D9%85-%D9%8A%D8%B9%D8%AA%D8%AF%D9%8A-%D8%A8%D8%A7%D9%84%D8%B9%D9%86%D9%81-%D8%B9%D9%84%D9%89-%D8%AA%D9%84%D9%85
अहवालात म्हटले आहे : “सोशल मीडिया युजर्सनी एका शिक्षकाच्या हिंसक कृत्याचा धक्कादायक व्हिडीओ प्रसारित केला. सुसे येथील खैर एद्दीन पाशा शाळेत एका विद्यार्थ्याला मारहाण”. सुसे हे ट्युनिशियातील एक शहर आहे. यावरून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडीओ भारतातील नसून ट्युनिशियाचा आहे. वृत्तानुसार ही घटना २०२१ मध्ये घडली होती.
https://g.co/kgs/dtJS47z
निष्कर्ष : ट्युनिशियातील एका शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा हा जुना व्हिडीओ भारतातील अलीकडील असल्याचे म्हणून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. परंतु, तपासानुसार व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.