Farmers protest viral video : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा तीव्र स्वरूप धारण केले आहे. किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. मात्र, यादरम्यान लाइटहाऊस जर्नालिजमला सोशल मीडियावर शेतकऱ्यांचा निषेध करणाऱ्या एका गटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ लोकांचा एक गट रस्त्यावर उतरल्याचा या व्हिडीओमधून दावा केला जात होता. परंतु, यामागे नेमके सत्य काय आहे ते पाहू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

सोशल मीडियावर “शेतकऱ्यांचा निषेध करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्यासाठी कट्टर हिंदू रस्त्यावर उतरले आहेत. २०२० मधील दिल्लीत झालेल्या दंगलीमध्येही असेच केले होते”, अशा कॅप्शनसह Crime Reports India नावाच्या एका एक्स [पूर्वीचे ट्विटर] वापरकर्त्याने हा व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.

हेही वाचा : Fact check : मुंबई येथील मीरारोडचा व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडीओ खरा की खोटा? काय आहे सत्य जाणून घ्या

व्हिडीओ पाहा :

या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

तसेच इतर वापरकर्तेदेखील व्हायरल होणारा हा व्हिडीओ शेअर करत आहेत, पाहा :

तपास :

हा व्हिडीओ काळजीपूर्वक ऐकून आम्ही या संदर्भात तपास सुरू केला, तेव्हा व्हिडीओमध्ये ‘लंबे लांबे लठ बजाओ’ अशा घोषणा दिल्या जात असल्याचे ऐकायला मिळाले. त्यानंतर आम्ही ते शब्द, वाक्य गूगलवर सर्च केले, तेव्हा ‘Awakened Bharat’ नावाच्या एका फेसबुक प्रोफाइलवर २५ डिसेंबर २०१९ रोजी अपलोड केलेला हा व्हिडीओ सापडला.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच हिंदुस्थान 1st न्यूजच्या युट्यूब चॅनेलवरदेखील तोच व्हिडीओ अपलोड केलेला आम्हाला आढळून आला.

अपलोड केलेल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडीओ ‘हरियाणामध्ये काढलेल्या CAA समर्थन रॅलीचा आहे’ असे नमूद केले आहे. इतकेच नाही तर याबद्दल आम्हाला एक हिंदी बातमीदेखील सापडली आहे.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या बातमीमध्ये भाजपाचे प्रवक्ते, ‘ जवाहर यादव’ यांनी केलेली एक एक्स [पूर्वीचे ट्विटर] पोस्टदेखील होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी हा व्हिडीओ हरियाणाचा असल्याचे सांगितले होते. पुढे त्याच पोस्टवरील एका कमेंटमध्ये, युजरने तो व्हिडीओ दिल्लीचा असल्याचे सांगितले होते.

यावर आम्ही पुन्हा एकदा गूगल सर्च करून व्हिडीओ शोधला. आम्हाला या शोधात फेसबुकवर शेअर केलेला व्हिडीओ सापडला; ज्यामध्ये “दिल्ली पोलिस तुम लठ्ठ बजाओ हम तुम्हारे साथ है” असे नारे दिले होते.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा व्हिडीओ २५ डिसेंबर, २०१९ रोजी पोस्ट करण्यात आला होता.

त्यानंतर आम्हाला अशा बातम्या सापडल्या, ज्यात हा व्हिडीओ दिल्लीचा आहे असे वृत्त होते.

CAA, NRC घमासान: ‘दिल्ली पुलिस लठ बजाओ, हम तुम्हारे साथ हैं’ के लगे नारे, वीडियो वायरल..

यात आम्हाला एका दुकानासमोर ‘लता साडी’ लिहिलेले आढळले आणि फेसबुकवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये दिल्लीतील लक्ष्मी नगर येथून रॅली काढण्यात आल्याचा उल्लेख आहे. म्हणून, आम्ही गूगल मॅपमध्ये ‘लता साडी, लक्ष्मी नगर, दिल्ली’ असे काही शोधले. हा शोध घेतल्याने नेमक्या कोणत्या रस्त्यांवर आंदोलन झाले होते तेदेखील सापडले.

गूगल मॅप लिंक

निष्कर्ष:

या सर्व तपासावरून आम्हाला असे लक्षात आले की, व्हायरल होणारा व्हिडीओ हा २०१९ सालचा असून, तो हरियाणामध्ये CAA च्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीचा आहे. परंतु, तो अलीकडे केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या निषेधाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सर्व गोष्टी लक्षात घेता हा व्हायरल दावा खोटा आहे, असा आपण निष्कर्ष करू शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check of viral video group of people are striking against farmers protest what is the truth behind it check out dha