Fact Check Of Mahakumbh Mela 2025 Viral Video: महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो. महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी प्रयागराज येथे आयोजित केला जातो. हा मेळा १३ जानेवारीपासून सुरू झाला असून २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे; तर यादरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तर लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये एक साधू आगीवर झोपताना दिसत आहेत . हा व्हिडीओ अलीकडील महाकुंभातील असल्याचा दावा करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ १५ वर्षांहून अधिक जुना आहे. जुना व्हिडीओ अलीकडील महाकुंभमेळा २०२५ चा आहे असे सांगून खोटा दावा करण्यात आला आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर दीपक शर्माने त्यांच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ ‘महाकुंभातील महान संतांचे अग्निस्नान, ज्याने पाहिलं तो बघतच राहिला.. ओम हर हर हर हर हर हर हर महादेव’ या कॅप्शनसह, खोट्या दाव्यासह शेअर केला आहे.

इतर युजरदेखील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच खोट्या दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलवर व्हिडीओ अपलोड करून आणि मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज चालवून तपास सुरू केला.

पण, आम्हाला यातून काहीच निष्पन्न झाले नाही.

त्यानंतर आम्ही ‘Sadhu sleeping on fire’ असा एक गूगल कीवर्ड सर्च केला.

यामुळे आम्हाला आज तकच्या यूट्यूब चॅनेलवर चार व्हिडीओ सीरिज मिळाल्या.

तेव्हा समजले की, हा व्हिडीओ १५ वर्षांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता.

आम्हाला इंडिया डिव्हाईन या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला आणखी एक व्हिडीओ सापडला.

यात साधू आगीवर झोपताना दाखवण्यात आले आहेत . ही घटना ८ जुलै २००८ रोजी अपलोड केलेल्या व्हिडीओमधील क्लिप होती. डिस्क्रिप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘द फायर योगी’ हा ४७ मिनिटांचा माहितीपट आहे, जो एका योगींच्या प्रवासाचा शोध घेतो; ज्याच्याकडे अग्निशी एकरूप होण्यासाठी एक अद्वितीय श्वास तंत्र वापरण्याची असाधारण क्षमता आहे. या माहितीपटात भारतातील योगींनी केलेल्या दुर्मीळ आणि असामान्य अग्निविधी आणि त्यानंतर त्याच्या कपड्यांचे रासायनिक विश्लेषण आणि या अलौकिक घटनेचे परीक्षण करणाऱ्या शारीरिक चाचण्यांचे चित्रण केले आहे. योगींनी गेल्या ४५ वर्षांत एकूण १००० दिवस हा अग्निविधी केला आहे. फक्त ९४ पौंड (४३ किलो) वजनाचा योगी गेल्या २८ वर्षांपासून फक्त दोन केळी आणि फक्त एक ग्लास दूध आणि दिवसातून दोनदा काही थेंब पाणी पिऊन जगला आहे. योगींचे अनेक पैलू अविश्वसनीय आहेत. पण, त्याचवेळी त्यांचे मानवी मन, शरीर, आत्म्याची शक्ती आणि सहनशक्ती अधोरेखित करतात.

निष्कर्ष :

तंजोर येथील साधू आगीवर झोपले आहेत असे दाखवणारा १५ वर्षांचा व्हिडीओ महाकुंभ २०२५ चा अलीकडील आहे असे खोट्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहे, त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check of viral video whos shows sadhu sleeping on fire in mahakumbh mela 2025 prayagraj here are the truth asp