Clash Between Members Of Nihang & Muslim Community: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुस्लिम लोकांनी निहंग शीख समुदायाच्या लोकांवर दगडफेक, लाठ्या-काठ्यांद्वारे हल्ला केला आणि त्यानंतर निहंग शीख पळून गेल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ आताचा सांगून शेअर केला जात आहे. पण, तपासादरम्यान (Fact check) आम्हाला आढळले की, अमृतसरचा हा जुना व्हिडीओ आहे आणि त्यात निहंग शीख व ख्रिश्चन समुदायातील लोकांमध्ये भांडण होताना दिसत आहे.

काय होत आहे व्हायरल?

CSMT Railway Police arrested youth who molested 17 year old girl in Chennai train
चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणारा आरोपी गजाआड, दोन दिवस पोलिसांकडून आरोपीचा शोध
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
gaddars in government will lose jobs after Assembly polls says Uddhav Thackeray At Mumbai job fair
दीड महिन्यानंतर गद्दार बेरोजगार; उद्धव ठाकरेंची शिंदे यांच्यावर टीका
A five year old boy was molested by minors Pune print news
पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार
Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
Prime Minister Narendra Modi with Israeli counterpart Benjamin Netanyahu
Israel Attack : इस्रायल- लेबनॉनदरम्यान वाढत्या संघर्षावर मोदींचा थेट बिन्यामिन नेतान्याहू यांना फोन; म्हणाले, “जगात…”
israeli air force launches attacks on houthi
लेबनॉनमधील हेजबोलानंतर इस्रायलचा हुथी बंडखोरांवर हवाई हल्ला; येमेनमधील होदेदाह बंदराला केलं लक्ष्य!

एक्स (ट्विटर) युजर @rajasolanki71070 वर हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.

इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून पुढे तपास सुरू केला.

काही यूट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून आम्हाला कळले की, व्हिडीओमधील लोक निहंग शेख आणि ख्रिश्चन आहेत.

त्यानंतर आम्ही दोन समुदायांमध्ये भांडण नक्की झालं आहे का हे तपासण्यासाठी शोध सुरू केला.

मग आम्हाला दैनिक ट्रिब्युन इंडिया वेबसाइटवर एक लेख सापडला.

https://www.tribuneindia.com/news/amritsar/confrontation-outside-church-youths-hurt-vehicles-vandalised-510080

२२ मे २०२३ रोजी अपलोड केलेल्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे की, रविवारी प्रार्थनेदरम्यान चर्चबाहेर निहंग शेख यांचा पोशाख घातलेले काही लोक गावात आले, असा संशय शीखांना आला आणि त्यांनी त्यांना चर्चमध्ये जाण्यापासून त्यांना रोखलं.

आम्हाला रोजाना स्पोक्समनच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या या घटनेचा व्हिडीओ सापडला.

आम्हाला वेगवेगळ्या मीडिया चॅनेलवर अपलोड केलेले भांडणाचे काही व्हिडीओदेखील सापडले.

गेल्या वर्षी मे महिन्यात अपलोड केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, निहंग शिखांच्या वेशभूषेत सुमारे १५ ते २० लोकांनी रविवारी अमृतसर येथील एका खेडेगावातील चर्चवर हल्ला केला. लोकांनी वाहने आणि भाविकांचेही नुकसान केले. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे ख्रिश्चन समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ख्रिश्चन समुदायाने आंदोलन पुकारले आहे.

टाइम्स ऑफ इंडियामधील एका अहवालात नमूद केले आहे की, २१ मे २०२३ रोजी राजेवाल गावातील चर्चमध्ये ख्रिश्चन समुदायाने निहंग शीख गटाला दगडफेक करून जखमी केले. सप्टेंबर २०२२ मध्ये अमृतसर जिल्ह्यातील ब्यास येथे निहंग शिखांच्या एका गटाने राधा सोमी सत्संगाच्या अनुयायांशी भांडण केले होते.

https://timesofindia.indiatimes.com/city/chandigarh/sultanpur-lodhi-clash-nihang-sikhs-police/articleshow/105523651.cms

निष्कर्ष : अमृतसरमधील राजेवाल गावात निहंग शिख आणि ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांमधील संघर्षाचा जुना व्हिडीओ मुस्लिम आणि निहंग शिख समुदायाच्या सदस्यांमध्ये अलीकडेच हाणामारी झाली आहे. पण, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे, असे आमच्या तपासातून समोर आलं आहे.