Viral Photo Shows PM Narendra Modi Wearing A Watch : सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो दुपारी ३ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका कामगाराने गुप्तपणे काढला असा दावा केला जातो आहे. त्याचबरोबर पोस्टमध्ये पुढे असे म्हटले आहे की, त्या कामगाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालकीच्या आलिशान वस्तू ठेवण्यासाठी स्वतंत्र खोल्या आहेत असा दावा केला आहे. पण, तपासादरम्यान लाईटहाऊस जर्नलिझमला काहीतरी वेगळेच आढळले. हा फोटो एआय-जनरेटेड आहे, असे त्यांना समजले.

नक्की काय होत आहे व्हायरल?

@AAPkaRamGupta या एक्स (ट्विटर) युजरने व्हायरल दाव्यासह हा फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका खोलीत हातात घड्याळ घालताना दिसत आहेत.

पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन बघा…

https://archive.ph/sabI4

इतर युर्जसदेखील अशाच व्हायरल दाव्यांसह हा फोटो शेअर करत आहेत…

तपास

१. फोटोच्या अस्पष्ट बॅकग्राऊंडमुळे हा फोटो एआय जनरेट आहे असे दिसून आले आहे.

२. त्यानंतर आम्ही एआय इमेज डिटेक्टरद्वारे फोटोची तपासणी केली.

३. HIVE मॉडरेशनने असे सांगितले की, इनपूट ९८.४ टक्के एआय जनरेट करण्यात आलेला आहे.

AI generated PM Narendra Modi Photo Viral

४. दुसरा एआय डिटेक्टर sightengine ने देखील असे सांगितले की, ही प्रतिमा एआय जनरेट करण्यात आली आहे.

AI generated PM Narendra Modi Photo Viral

५. इतर एआय डिटेक्टर, wasitai आणि aiimagedetector.org ने देखील सांगितले की, हा फोटो एआय जनरेट करण्यात आला आहे.

AI generated PM Narendra Modi Photo Viral
AI generated PM Narendra Modi Photo Viral

निष्कर्ष :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घड्याळ घालतानाचा व्हायरल फोटो एका कामगाराने गुपचूप क्लिक केल्याचा दावा केला आहे. पण, खरंतर हा फोटो एआय-जनरेटेड आहे, त्यामुळे तपास सांगतो की, व्हायरल होणारा फोटो दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader