Local Msg ride helpline numbers for women : महाराष्ट्र्र सरकारकडून महिलांच्या सुरक्षेसाठी एक योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत संध्याकाळी ६ ते १० यादरम्यान महिलांना घरी सोडण्यासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध असेल, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. महिलांच्या या सेवेसाठी १०९१ व ७८३७०१८५५५ हे दोन हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीत महिला या नंबरवर मेसेज किंवा मिस कॉलसुद्धा देऊ शकतात. ही सुविधा देशभरात उपलब्ध असल्याचे एका पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. पण, ही योजना खरेच महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे का? याबद्दल काय खरं आहे व काय खोटं याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

सोशल मीडियाच्या @kumar_sant51262 या एक्स ( ट्विटर) अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो व महिलांना सोडण्यासाठी स्पेशल गाड्यांचे फोटो देण्यात आले आहेत आणि कॅप्शनमधून या योजनेबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

इतर युजर्सदेखील ही पोस्ट शेअर करताना दिसत आहेत…

हेही वाचा…VIDEO: असा वाढदिवस होणे नाही! ग्राहकाने दरवाजा उघडताच गाणं वाजलं अन्… डिलिव्हरी बॉयने अनुभवला आनंदाचा क्षण!

तपास :

आम्ही पोस्टमध्ये शेअर केलेल्या दोन हेल्पलाइन नंबरचा वापर करून आमचा तपास सुरू केला. आम्ही हेल्पलाइन क्रमांक ‘७८३७०१८५५५’ हा नंबर घेऊन गूगलवर सर्च केले. तेव्हा आम्हाला २०१९ मधील एक पोस्ट सापडली; ज्यामध्ये चित्तूर, आंध्र प्रदेशमधील महिलांसाठी मोफत राइड योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. शेअर केलेल्या बातमीत दोन्ही हेल्पलाइन क्रमांकांचा उल्लेख करण्यात आला होता.

आम्हाला याचसंदर्भातील आणखी एक बातमीदेखील आढळली. बातमी पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…

https://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/free-ride-scheme-for-women-in-chittoor/article30231028.ece

आम्हाला रिपब्लिकमधील २०१९ मधील बातम्यांचा अहवालदेखील सापडला. त्यामध्ये महिलांना मोफत राइड योजना ऑफर करणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, सिक्कीम, पंजाब, चित्तूर पोलीस रात्रीच्या वेळी महिलांना मोफत राइड देत आहेत. नागपूर पोलिस, कर्नाटक पोलिस व लुधियाना पोलिसांनीही हा उपक्रम सुरू केल्याचेही अहवालात शेवटी नमूद करण्यात आले आहे.

https://www.republicworld.com/india/sikkim-police-to-offer-free-rides-to-women-at-night

https://www.news18.com/news/buzz/ludhiana-police-to-now-give-free-rides-to-women-unable-to-find-cabs-at-night-2408711.html

आम्हाला एएनआय डिजिटलची एक्स (ट्विटर)वर एक पोस्ट केलेली आढळून आली; ज्यात नमूद करण्यात आले आहे की, नागपूर पोलिसांकडून रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत अडकून पडलेल्या महिलांना मोफत राइड सेवा प्रदान केली जात आहे.

नागपूर शहर पोलिसांनी २०१९ मध्येही याबद्दलची पोस्ट टाकली होती.

तपासादरम्यान आम्हाला अशी कोणतीच योजना जाहीर झाली आहे असे आढळून आलं नाही. पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या हेल्पलाइन क्रमांकांसह काही स्थानिक पोलिस असे उपक्रम राबवीत आहेत हेसुद्धा तपासात आढळून आले.

निष्कर्ष : स्थानिक पोलिसांचा उपक्रम आहे, असे सांगून हेल्पलाइन क्रमांक चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहेत. त्यामुळे महिलांसाठी मोफत राइड योजना सुरू केली आहे हे सांगणारा हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.