Fact Check News : सोशल मीडियावर दर दिवशी हजारो व्हिडीओ व्हायरल होतात पण व्हायरल होणारे प्रत्येक व्हिडीओ नेहमी खरे नसतात. अनेकदा व्हिडीओद्वारे केलेला दावा खोटा असतो किंवा दिशाभूल करणारा असतो. सध्या असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मोठा पूल दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये हा जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग ४४ असल्याचा दावा केला आहे. पण खरंच हा पूल जम्मू काश्मिरमधील आहे का?
लाइटहाऊस जर्नलिझमलने याविषयी तपासणी केली तेव्हा त्यांना काय आढळून आले, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

एका सुंदर पुलाचे व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात असल्याचे लाइटहाऊस जर्नलिझमला दिसून आले. या व्हिडीओबरोबर दावा करण्यात करण्यात आला होता की हा व्हिडीओ जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गाचे असून आता सर्वांसाठी सुरू आहे. पण जेव्हा लाइटहाउस जर्नलिझमने याविषयी तपास केला तेव्हा तपासादरम्यान त्यांना आढळून आले की हा व्हिडिओ भारतातील नसून चीनमधील एका पुलाचा आहेत आणि हा व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.

sadhguru jaggi vasudev isha foundation
“आम्ही कुणालाही लग्न करायला वा संन्यासी व्हायला सांगत नाही”, जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’चं ‘त्या’ आरोपांवर स्पष्टीकरण!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Heroic Railway Employee Saves Young Woman from Suicide: Viral Video
आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे धावली तरुणी, कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले, धक्कादायक VIDEO VIRAL
Reservation and privilege should also be sub categorized
आरक्षण आणि सत्तालाभाचेही उपवर्गीकरण व्हावे!
girish kuber sitaram Yechury marathi news
अन्यथा: एकेक फोन गळावया…
modi dont have time for Manipur marathi news
लोकमानस: मोदींना मणिपूरसाठी वेळ नसावा?
Asaduddin-Owaisi-1
ताजमहलच्या गळतीवरून असदुद्दीन ओवेसींचे भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धीवर ताशेरे; म्हणाले, “हे म्हणजे १० वीत नापास विद्यार्थ्याने…”
sebi fined rs 650 crore to 22 companies including anil ambani part 2
अबब भयंकर शिक्षा ! (भाग २)

व्हायरल व्हिडीओ

व्हिडिओ १:

फेसबुक यूजर येन्सी मोहनने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.facebook.com/100081015942728/videos/1083149520477742

या पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन येथे पाहा

https://web.archive.org/web/20240930074533/https://www.facebook.com/100081015942728/videos/1083149520477742

हेही वाचा : पोलिस कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी चप्पलने मारहाण? चलान कापल्याने संताप? VIRAL VIDEO चा २०१८ च्या घटनेशी संबंध काय? वाचा सत्य

इतर युजर्स देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.

व्हिडिओ २:

X युजर @OPT_KHARIWALE ने या पुलाचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला असून हा पुल NH 44 असल्याचा दावा केला आहे.

या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन इथे पाहा https://archive.ph/m5npq

इतर युजर्स देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.

https://fb.watch/uW4uNIdY9e/

हेही वाचा : Viral Video : ‘मी अध्यक्षाचा मुलगा’ बोलत तरुणाने भर रस्त्यात काढली तरुणीची छेड, त्यानंतर त्याला घडवली चांगलीच अद्दल

तपास:

व्हिडिओ १:

लाइटहाऊस जर्नलिझमने व्हिडिओच्या स्क्रीनशॉट्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास केला तेव्हा त्यांना CGTN च्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये हा पूल दिसला. या व्हिडिओचे शीर्षक होते: “चीनमधील बेइपानजियांग ब्रिज (Beipanjiang Bridge) अधिकृतपणे हा जगातील सर्वात उंच पूल आहे”

रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर प्रॉम्प्टनेही व्हिडिओ बेइपानजियांग ब्रिजचा असल्याचे सांगितले

लाइटहाऊस जर्नलिझम चायना डेली आणि शंघाई डेलीच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेला असाच व्हिडिओ दिसून आला.

https://www.facebook.com/watch/?v=532969480704729

https://www.facebook.com/watch/?v=803882150472019

यावरून असे समोर आले की या व्हिडिओमध्ये जगातील सर्वात उंच पूल बेइपानजियांग ब्रिज आहे. गुइझोऊ आणि युन्नान या दोन भागात बेई नदीच्या कॅन्यन दरीच्या वर ५६५ मीटर (१,८५० फूट) बांधला आहे.

व्हिडिओ २:

व्हिडिओवरून मिळालेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही या व्हिडिओचीही तपासणी सुरू केली.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर असे दिसून आले की या व्हिडिओमध्ये आयझाई ब्रिज दाखवला आहे.
चीनमधील पीपल्स डेलीच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेले पुलाचे दृश्य आम्हाला आढळले.

https://www.facebook.com/watch/?v=1197093985074034

आयझाई हा जगातील सर्वात उंच पुलांपैकी एक आहे.

https://www.businessinsider.in/incredible-drone-footage-shows-a-bridge-in-china-that-is-literally-above-the-clouds/articleshow/61343867.cms

पुलाच्या अनेक प्रतिमा स्टॉक इमेज वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
https://www.alamy.com/stock-photo/aizhai-bridge.html?sortBy=relevant

निष्कर्ष: व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवलेला पूल जम्मू आणि काश्मीरमधील नसून चीनमधील बेइपानजियांग पूल आणि आयझाई पुल आहे. सोशल मीडियावर केलेला दावा खोटा व दिशाभूल करणारा आहे.