Maha Kumbh Mela 2025 Drone Show Fact Check Video : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या महाकुंभ मेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. महाकुंभ मेळ्यासंबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, लाईटहाऊस जर्नलिझमला याचसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी भव्य ड्रोन शोचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी एका मोकळ्या मैदानात एकामागोमाग एक हजारो ड्रोन्स रांगेत ठेवले जात आहेत. पण, खरेच अशा प्रकारचा कोणता भव्य ड्रोन शो प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात होणार आहे का? तसेच व्हायरल होणारा तो व्हिडीओ खरेच महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणचा आहे का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर मोहन भागवत (पेरोडी) यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवर व्हिडीओ शेअर केला.

अर्काइव्ह व्हर्जन

https://archive.ph/HPT6o

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास :

व्हिडीओमधून मिळालेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला.

त्यामुळे आम्हाला लिंक्डइनवरील एक पोस्ट सापडली.

पोस्टमध्ये नमूद केले आहे : तुम्ही कधी सांताक्लॉजला आकाशात ५,००० ड्रोनद्वारे जिवंत होताना पाहिले आहे का? टेक्सासमधील मॅन्सफील्ड येथील स्काय एलिमेंट्सच्या या जबरदस्त देखाव्याने विक्रम मोडले आणि ड्रोन शोद्वारे काय शक्य आहे ते पुन्हा सिद्ध करून केले.

वरील तपशिलांचा वापर करून आम्ही कीवर्ड सर्च केला.

यावेळी आम्हाला FoX5 अटलांटावरील एका बातमी सापडली. त्यात नमूद केले होते की, उत्तर टेक्सासमधील एका ड्रोन कंपनीने मॅन्सफिल्डवर हॉलिडे डिस्प्लेसह एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. कोपेलच्या स्काय एलिमेंट्स ड्रोन शो आणि UVify ने २६ नोव्हेंबर रोजी एका भव्य ड्रोन शोचे आयोजन केले होते. या हॉलिडे डिस्प्लेसाठी ४,९८१ ड्रोन वापरण्यात आले होते.

https://www.fox5atlanta.com/news/drone-show-mansfield-texas-world-record

इतर अनेक बातम्यांमध्येही याचा उल्लेख आहे.

Sky Elements Sets Guinness World Record with 5,000-Drone Gingerbread Village Holiday Show
https://timesofindia.indiatimes.com/world/us/watch-sky-elements-sets-new-us-record-with-largest-drone-show-over-texas/articleshow/116068314.cms

आम्हाला यासंबंधी एक व्हिडीओ रिपोर्टदेखील सापडला.

आम्हाला स्काय एलिमेंट्स ड्रोन्सचे फेसबुक पेज सापडले. त्यात आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ ५,००० ड्रोन्स सांता या कॅप्शनसह पोस्ट केला गेला आहे.

हीच रील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही होती.

निष्कर्ष :

अमेरिकेतील स्काय एलिमेंट्स ड्रोन्सने ख्रिसमसपूर्वी टेक्सासमधील मॅन्सफिल्डवर ५,००० ड्रोन उडवून सर्वांत मोठ्या ड्रोन शोचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्याच कार्यक्रमाचा एक व्हिडीओ प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यादरम्यानचा असल्याचा खोटा दावा करीत शेअर केला जात आहे. त्यामुळे हा व्हायरल दावा बनावट आणि दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader