सोशल मीडियावर सध्या रस्त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यावर मोठा खड्डा जो पाण्याने पूर्ण भरलेला आहे. रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने खड्यामधून जात आहे. दुरवस्था झालेल्या रस्त्याचा हा व्हिडीओ शेअर करताना तो उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील असल्याचा दावा केला जात आहे व्हिडिओमध्ये ‘वेलकम टू इंडिया’ असा व्हॉईस ओव्हर देखील ऐकू येतो आहे. पण
तपासादरम्यान हा व्हिडिओ लखनऊचा नसून चीनचा असल्याचे उघड झाले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
X युजर Rumaisa Anam ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला ज्यामध्ये व्हिडीओ लखनऊचा असल्याचा दावा केला आहे
इतर वापरकर्ते देखील याच दाव्यासह व्हिडिओ शेअर करत आहेत.
काय सांगतो तपास?
व्हिडिओचे निरीक्षण केल्यानंतर असेल लक्षात येते की, त्यात परदेशी भाषेतील काही साइन बोर्ड दिसत जो चीनी भाषा असल्यासारखा दिसत आहे. दरम्यान याचा मुळ व्हिडीओ redd.tube वर व्हिडिओ सापडला जो साधारण ४ महिन्यांपूर्वी शेअर केला होता.
येथे पाहा व्हिडीओ – https://www.redd.tube/video/b2f4488f3465ed65eafe626b5aa60079f2f5d5d4
तसेच व्हिडीओवर ‘AndroVid’ असे लिहलेले दिसले, जो एक व्हिडिओ एडिटर अँप्लिकेशन आहे.
याचा आणखी एक व्हिडिओ Daily Content नावाच्या युट्युब चॅनेल वर सापडला. टायटल मध्ये लिहले होते, ‘चीनमध्ये विलक्षण मोठा खड्डा जो craters सारखा आहे. हा व्हिडिओ २०२० साली अपलोड केलेला होता.
दोन्ही व्हिडिओ सारखेच आहेत आणि व्हिडिओमध्ये दिसणारी वाहने देखील यूट्यूब लिंकवर दिसलेली वाहने तशीच होती.
सिनेमा टीव्हीवरही तोच व्हिडिओ सापडला, ज्यात मुसळधार पावसामुळे चीनमधील काही मोठ्या रस्त्यांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
तसेच हा व्हिडिओ Videoman वेबसाईट वर देखील सापडला. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहले होते, ‘दोन मोठ्या खड्ड्यांवरून वाहने जात आहेत.
येथे पाहा व्हिडीओ – https://www.videoman.gr/en/164431
वर्णनात असे म्हटले आहे की, “वाहन एका चिनी शहरात पाण्याने भरलेल्या दोन मोठ्या डबक्यावरून जात आहे. वाहने मोठ्या उंचीवर झेपावतात आणि डांबरी रस्त्यावर जोरदार आदळतात.”
आम्हाला ‘CarsWithPotholes’ या YouTube चॅनेलवर पोस्ट केलेला व्हिडिओ देखील सापडला आहे जो २०२० ला पोस्ट करण्यात आला होता.
त्यामुळे हा व्हिडिओ २०२० मध्ये काढण्यात आला असून तो चीनचा असल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष: रस्त्यावरील खड्ड्यांतून गाड्या उसळतानाचा व्हिडिओ २०२० चा आहे,जो भारतातील नाही तरी चीनमधील आहे. त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे.