लॉजिकली फॅक्ट्स : कुंभमेळ्यात मोनालिसा भोसले या माळा विक्रेत्या तरुणीला सोशल मीडियामुळे रातोरात प्रसिद्धी मिळाली. तिचे सुंदर डोळे आणि साधे राहणीमान पाहून अनेकांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडली. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ती कोणत्या न कोणत्या कारणाने सतत चर्चेत येत होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर मोनालिसाचे डान्स करतानाचे आणि फोटोसाठी पापाराझींना पोझ देतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत; पण हे व्हिडीओ खोटे असल्याचे समोर आले आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल?

भारतातील मध्य प्रदेशात राहणारी मोनालिसा भोसले ही मुलगी जगातील सर्वात मोठ्या हिंदू मेळाव्यांपैकीमध्ये एक असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये उपस्थित होती. १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू झालेल्या आणि २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात आपल्या कुटुंबासह माळांची विक्री करत होती. सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व काही बदलले. व्हायरल क्लिप्स फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि एक्ससारख्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले. महाकुंभ महोत्सवात प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले ही फोटो, पत्रकारांसाठी नाचताना आणि पोझ देतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यपैकी एका व्हिडीओमध्ये मोनालिसा लाल वनपीसमध्ये नदीकिनारी हिंदी गाण्यावर नाचताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर काळ्या ड्रेसमध्ये नाचताना दिसत आहे आणि तिसऱ्या व्हिडीओमध्ये ती फोटोसाठी पापाराझींकडे पाहून पोझ देताना दिसत आहे. पण, प्रत्यक्षात हे व्हिडीओ खोटे असल्याचे समोर आले आहे. हे सर्व व्हिडीओ डीपफेक असल्याचे आढळून आले. पहिले दोन व्हिडीओ एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे आहेत, तर तिसऱ्या व्हिडीओमध्ये एक बॉलीवूड कलाकार मीडियाशी संवाद साधताना दिसत आहे.

तपास:

व्हायरल क्लिप्सचे बारकाईने परीक्षण केल्यावर त्यांच्या चेहऱ्याच्या अनैसर्गिक हालचाली आणि त्वचेच्या रंगात बदल यासारख्या लक्षणीय विसंगती आढळून आल्या. आम्हाला मूळ व्हिडीओदेखील सापडले, ज्यांचा वापर करून हे क्लिप्स तयार केले गेले होते.

व्हिडीओ १

https://www.instagram.com/p/DFWla0lomWT/?hl=en

मोनालिसाचा लाल ड्रेसमधील पहिला व्हायरल व्हिडीओ “ni8.out9” नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा वॉटरमार्क आहे. हे अकाउंट तपासल्यानंतर आम्हाला वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर तोच व्हिडीओ आढळला, जिथे बायोमध्ये “डिजिटल क्रिएटर” असे लिहिले होते. पण, व्हिडीओ डिजिटली बदलण्यात आला आहे असे स्पष्ट करणाऱ्या डिस्क्लेमरसह शेअर करण्यात आला आहे.

कॅप्शनमधील डिस्क्लेमरमध्ये म्हटले आहे की, “टीप : हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी फेस स्वॅप तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. येथे दाखवलेल्या कलाकारांच्या प्रतिमा आणि प्रतिमा डिजिटली बदललेल्या आहेत आणि त्या दाखवलेल्या व्यक्तींचे खरे स्वरूप, समर्थन किंवा मते प्रतिबिंबित करत नाहीत. फसवणूक किंवा दिशाभूल करण्याचा कोणताही हेतू नाही; सर्व आशय केवळ मनोरंजन आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी आहे. प्रेक्षकांना विवेकबुद्धीचा वापर करावा लागेल.”

या क्लिपचा रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला ११ डिसेंबर २०२४ रोजी तनु रावत नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला मूळ व्हिडीओ सापडला. तुलना केल्यावर पुष्टी झाली की, व्हायरल क्लिपमध्ये मोनालिसाचा चेहरा रावतच्या चेहऱ्याऐवजी बदलण्यात आला होता.

व्हिडीओ २

https://www.instagram.com/p/DFbj5yCI8j4/?hl=en

काळ्या ड्रेसमध्ये नाचतानाचा दुसरा व्हिडीओ देखील “ni8.out9’s” या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. मागील व्हिडीओप्रमाणेच, या व्हिडीओमध्येदेखील रावतच्या ऐवजी मोनालिसाचा चेहरा बदलण्यात आला होता. मूळ व्हिडीओ १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पोस्ट करण्यात आला होता आणि मोनालिसाचा चेहरा जोडण्यासाठी तो आडवा करण्यात आला आहे.

शिवाय, ‘ni8.out9’ हे अकाउंट तपासल्यानंतर मोनालिसाचे असे अनेक बदललेले व्हिडीओ आढळले, जे सर्व खरे नसल्याचा दावा करणारे डिस्क्लेमर आहेत.

व्हिडीओ ३

तिसऱ्या व्हिडीओबाबत खुलासा करताना लक्षात आले की, मूळ व्हिडीओमध्ये बॉलीवूड अभिनेत्री वामिका गब्बी होती. प्रत्यक्ष फुटेज येथे पाहता येईल.

आम्ही हे व्हिडीओ ऑनलाइन एआय डिटेक्शन टूल, हायव्ह मॉडरेशनद्वारे देखील चालवले, ज्याने व्हिडीओंमध्ये “एआय-जनरेटेड किंवा डीपफेक कंटेंट” असल्याचे दर्शविले.

वरील उपलब्ध पुरावे हे सिद्ध करतात की क्लिप डीपफेक आहेत.

निष्कर्ष

मोनालिसा भोसले यांच्या डान्स करतानाचा आणि पोझ देताना व्हायरल झालेल्या क्लिप्स डिजिटल पद्धतीने हाताळल्या आहेत. मूळ व्हिडीओंमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर तनु रावत आणि बॉलीवूड अभिनेत्री वामिका गब्बी दिसत होत्या.

क्रेडिट: https://www.logicallyfacts.com/en/fact-check/deepfake-videos-mahakumbh-girl-monalisa-bhosle

(ही कथा मुळतःलॉजिकली फॅक्ट्स(logicallyfacts) ने प्रकाशित केली आहे आणि ‘शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून ‘लोकसत्ता’ ने याचे भाषांतर करून पुनर्प्रकाशित करीत आहे.)