Fact Check: भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडीची (Indian National Developmental Inclusive Alliance) रॅली १ एप्रिल रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सुटकेसाठी दबाव टाकला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या रॅलीच्या अनेक फोटोंमध्ये रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी दर्शवणारा एक फोटो व्हायरल होत आहे. पण, हा फोटो जुना आहे आणि २०१९ मध्ये झालेल्या रॅलीतील कोलकाता येथील हा फोटो आहे. हा फोटो आताचा आहे, असा होणारा हा दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (ट्विटर) युजर मोहम्मद शमीम खानने व्हायरल चित्र आपल्या अकाउंटवर शेअर केले आहे, ज्यात लोकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. तसेच या फोटोला हिंदीमध्ये कॅप्शन देण्यात आली आहे की, “ये दिल्ली की भीड़ बता रही है की मोदी जी जिस तरह से आंधी की तरह आए थे उसी तरह तूफ़ान की तरह चले जाएंगे..” म्हणजेच “दिल्लीची ही गर्दी सांगत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी वादळासारखे आले तसे वादळासारखे निघूनही जातील”, असे युजरला म्हणायचे आहे.
इतर वापरकर्तेदेखील असेच काही फोटो शेअर करत आहेत –
तपास:
व्हायरल झालेल्या फोटोसंबंधित आम्ही रिसर्च केला तेव्हा आम्ही peoplesdemocracy.in या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या लेखापर्यंत पोहचलो.
https://peoplesdemocracy.in/2019/0210_pd/west-bengal-brigade-turns-red-sea
आर्टिकलचे शीर्षक होते: West Bengal: Brigade Turns into Red Sea
हा लेख फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रकाशित झाला होता. पण, हा फोटो मात्र कोणत्याही कॅप्शनशिवाय वापरण्यात आला होता. तसेच आम्ही लेखात वापरल्या गेलेल्या फोटोवर शोध घेण्यास सुरुवात केली आणि आम्हाला आढळले की,फोटो स्टॉक इमेज वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे.
https://www.alamy.com/kolkata-india-03rd-feb-2019-left-activist-from-different-part-of-state-take-part-in-the-left-front-brigade-rally-ahead-of-general-election-2019-credit-saikat-paulpacific-pressalamy-live-news-image234668247.html
तसेच या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ३ फेब्रुवारी २०१९ रोजी डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर लेफ्ट-फ्रंटच्या रॅलीत भाग घेताना दाखवण्यात आलं आहे. श्रेय: सैकत पॉल/पॅसिफिक प्रेस/अलामी लाइव्ह न्यूज
निष्कर्ष : काल दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या ‘इंडिया आघाडी’चे फोटो असल्याचा दावा खोटा आहे. तसेच २०१९ मधील रॅलीतील जुने फोटो आणि संबंधित नसलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.