Uddhav Thackeray Fact Check : केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच मराठी, पाली, प्राकृत, आसामी व बंगाली यांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे देशातील मान्यताप्राप्त अभिजात भाषांची संख्या आता ११ झाली आहे. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक विधान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उर्दूलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली असल्याची दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण उद्धव ठाकरेंनी खरंच असा कोणती मागणी केली आहे का जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक युजर वैभव चोरे पाटील यांनी एबीपीचे एडिटेड ग्राफिक शेअर केले आहे.

इतर युजर्सदेखील अशीच पोस्ट शेअर करीत आहेत.

तपास :

ग्राफिकवरून आमच्या लक्षात आलेली पहिली गोष्ट म्हणजे ‘ABP Maza’चा लोगो. ग्राफिकवर मजकूर होता, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तसाच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, ही आमची मागणी आहे.”

त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरेंनी असे काही विधान केले आहे का ते तपासले. आम्हाला त्याबद्दलचे कोणतेही वृत्त आढळले नाही आणि त्यानंतर आम्ही एबीपी माझाचे सोशल मीडिया हॅण्डल तपासले.

त्यानंतर आम्ही ग्राफिकमध्ये वापरलेल्या उद्धव ठाकरेंच्या फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च केले आणि X वर एक पोस्ट सापडली.

त्यावरून हे स्पष्ट झाले की, ग्राफिक २०२२ चे आहे; परंतु पोस्ट टेम्पलेट अगदी सारखेच होते.

एबीपी माझाच्या एक्स हॅण्डलवर उद्धव ठाकरेंच्या फोटोसह नुकतेच हेच टेम्प्लेट वापरले गेल्याचेही आम्हाला आढळले.

१८ मे २०२४ रोजी पोस्ट करण्यात आली होती.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही राज्यसभा खासदार व शिवसेनेच्या (यूबीटी) उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “खोटे आणि बनावट फोटोशॉप केलेले ट्वीट करणे ही भाजपची जुनीच खेळी आहे. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, ते जे काही खोटे बोलतील, ते एक ना एक दिवस पकडले जाईल. इतकी वर्षे सत्तेत राहिल्यावर त्यांच्याकडे दाखविण्यासाठी खूप कामे असतील, अशी आशा असते. पण, दाखविण्यासाठी कोणतेही काम नाही म्हणून अशा खोट्या गोष्टींवर ते अवलंबून राहतात.” त्यामुळे त्यांची ही पोस्ट खोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी दावा केल्याप्रमाणे, उर्दू ही शास्त्रीय भाषा नाही. परंतु, तमीळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम, ओडिया, मराठी, पाली, प्राकृत, आसामी व बंगाली या भारतातील ११ अभिजात भाषा आहेत.

‘बदला पुरा!’, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुंबईत झळकले देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर्स? Viral Photo खरा की खोटा; वाचा….

निष्कर्ष :

शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य असल्याचे सांगून शेअर करण्यात येत असलेले व्हायरल ग्राफिक एडिटेड आहे. उर्दूला भारताची अभिजात भाषा बनविण्याबाबतचे कोणतेही विधान त्यांनी केलेले नाही. व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader