Fact check: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. यामध्ये फोटो, व्हिडीओ, मिम्स यांचा समावेश असतो. आता सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ वेगाने पुढे जात आहे. वैद्यकीय, शिक्षण, तंत्रज्ञान, माध्यम असे कुठलेही क्षेत्र ‘एआय’ने सोडलेले नाही. प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’चा वापर होत आहेतर सध्या एआयचा (AI) वापर करून अनेक गोष्टी एडिट सुद्धा केल्या जात आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे लष्करी गणवेशातील दोन एआय (AI) निर्मित फोटो व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाइटहाऊस जर्नलिझमला अमेरिकेचे राष्ट्रपती जो बिडेन यांच्या लष्करी गणवेशातील दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. बिडेन यांनी सर्वोच्च लष्करी नेतृत्वाबरोबर बैठक घेतल्याचा दावा या फोटोंसह करण्यात आला होता.पण, तपास केल्यावर असे आढळून आले की, व्हायरल फोटो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा वापर करून तयार केल्या आहेत.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर @Aqssss ने व्हायरल फोटो आपल्या प्रोफाइलवर शेअर केले आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जो बिडेन लष्करी गणवेशात सर्वोच्च लष्करी नेतृत्वाबरोबर बैठक घेत असल्याचे दिसून येत आहेत.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत, ते पाहा :

हेही वाचा…गूगल मॅपने चुकवली वाट! व्यक्तीची अडकली गाडी अन्… पाहा व्हायरल VIDEO

तपास:

व्हायरल इमेजेसवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला कोणताही विश्वासार्ह स्त्रोत सापडला नाही ज्याने व्हायरल फोटो शेअर केल्या होत्या. त्यानंतर आम्ही फोटो झूम केले आणि संकेत शोधण्याचा प्रयत्न केला. फोटोत काही गोष्टी दिसून आल्या. जसे की, इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या फोटो ब्लर करणे, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचा फोन आणि इतर उपकरणांच्या फोटो अस्पष्ट करणे आदी गोष्टी फोटो एआय (AI) चा वापर करून निर्मित केले आहे ; असे सूचित करते. त्यानंतर आम्ही फोटो एआय (AI) डिटेक्टरद्वारे रन केल्या. HIVE मॉडरेशनद्वारे आम्हाला आढळून आले की, पहिली फोटो AI जनरेटेड असण्याची ९९.९ टक्के शक्यता होती. दुसऱ्या चित्रावर देखील HIVE मॉडरेशनद्वारे तेच रिझल्ट आम्हाला मिळाले. त्यानंतर आम्ही Maybe’s एआय आर्ट डिटेक्टरद्वारे प्रतिमा देखील तपासून पहिल्या . त्यामुळे चित्रे AI जनरेटेड आहेत ही गोष्ट स्पष्ट झाली.एक्स (ट्विटर) वरील अनेक पोस्ट्स आणि कम्युनिटी नोट्सद्वारे जोडलेल्या संदर्भांद्वारे आम्हाला आढळले की, फोटो एक्स (ट्विटर) वापरकर्त्याने ल्यूकने बनवली आहेत.

निष्कर्ष: या संपूर्ण तपास आणि माहितीवरून लष्करी पोशाखात दिसणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्रपती जो बिडेन यांच्या व्हायरल प्रतिमा एआय (AI) साधनांचा वापर करून तयार करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check us president joe bidens military uniform photo created by ai or not know the truth asp
Show comments