Fact Check : इस्रायल आणि इराणमध्ये आता चांगलाच संघर्ष पेटला आहे. आता इस्रायल-इराण युद्धाला तोंड फुटण्याची स्थिती आहे. अशात सोशल मीडियावर इस्रायल-इराण या दोन्ही देशांशीसंबंधित व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. मिसाईल खराब होण्याचा व्हिडीओ इराण इस्त्राइलच्या संघर्षादरम्यानचा असल्याचा दावा केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की इस्त्राइलवरमधून उडवलेली मिसाईल परत आली आहे आणि या मिसाईलने लाँच पॅडला उडवले आहे. तसेच आणखी एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हिजबुल्लाह रॉकेटने चुकीच्या पद्धतीने गोळीबार केला आणि यात पाच दहशतवादी ठार झाले. यावर लाइटहाऊस जर्नालिज्मने यावर तपास केला तेव्हा त्यांना वेगळी माहिती समोर आली आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर ज्यूश पॅट्रियटने त्याच्या अकाउंटवरून हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा : बाई काय हा प्रकार! दुर्गा पूजेनिमित्त मॉडेल्सचा अवतार पाहून भडकले नेटीझन्स; टीका होताच पुन्हा ‘तसा’ फोटो पोस्ट केला

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://web.archive.org/web/20241009061733/https://twitter.com/USAZionist/status/1843838027547980260

इतर युजर्सनी सुद्धा हाच व्हायरल व्हिडीओ इराण – इस्रायल संघर्षादरम्यानचा असल्याचा दावा केला आहे.

तपास:

लाइटहाऊस जर्नालिज्मने InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून तपास सुरू केला आणि त्यानंतर त्यांनी मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यानंतर त्यांना २५ जून २०२२ ची एक्सवर शेअर केलेली एक पोस्ट मिळाली.

कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे: #WarheadToTheForehead – रशियनच्या जमीनीवरून हवेत मिसाईल U-Turn करते आणि उड्डाणादरम्यान हे मिसाईल रशियाच्या जमीनीवर येऊन पडते.

आम्हाला news.com.au च्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला

यात असे लिहिले आहे की रशियन जमीनीवरुन हवेत उडवलेले मिसाईल खराब झाल्यामुळे स्वतःवर गोळीबार करत आहे.

हा व्हिडिओ २४ जून २०२२ ला अपलोड करण्यात आला होता. त्यांना या घटनेची बातमी देखील मिळाली.

https://www.newsweek.com/russian-air-defense-system-epic-malfunction-video-ukraine-war-1718997

https://www.dailymail.co.uk/news/article-10949493/Return-sender-Russian-missile-U-turns-smashes-troops-fired-malfunction.html

डेलीमेलवरील वृत्तात घटनेच्या ठिकाणाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

अहवालात म्हटले आहे: व्हिडिओ आज पहाटे अल्चेव्हस्क शहराजवळ चित्रित करण्यात आला होता आहे. हे शहप सेवेरोडोनेत्स्कच्या दक्षिणेस ५५ मैलांवर आहे. या ठिकाणी भयंकर लढाई सुरू आहे.

निष्कर्ष: रशिया जमीनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईलचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इराण-इस्रायल संघर्षादरम्यानचा आहे, असा दावा केला जात आहे. पण हा दावा दिशाभूल करणारा होता.