Mount Douglas Volcano Fact Check : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ आढळला. तो व्हिडीओ भारतातील कैलास पर्वतावरील मानसरोवर तलावाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्रामवर up_say नावाच्या युजरने व्हायरल व्हिडीओ याच व्हायरल दाव्यासह शेअर केला.

अर्काइव्ह लिंक.
https://archive.ph/dUHqF

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

हा व्हायरल व्हिडीओ आम्ही InVid टूलमध्ये अपलोड केला, त्यानंतर मिळालेल्या स्क्रीनशॉटद्वारे रिव्हर्स इमेज सर्च चालवून आम्ही तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला फेसबुक प्रोफाइल, नोएल बेलो एनजी अलास्का यांनी पोस्ट केलेला एक व्हिडीओ सापडला.

व्हिडीओवरील मजकुरात असे म्हटले होते की, हा अलास्कातील १३० ज्वालामुखींपैकी एक आहे.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला आणखी एक फेसबुक व्हिडीओ सापडला, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, माझा मित्र रस रॉबिन्सन आणि त्याची पत्नी किअर्सा यांच्या हेलिकॉप्टरमधून अलास्काच्या अविश्वसनीय ज्वालामुखीवरून उड्डाण करताना…

यावरून असे सूचित होते की, हा व्हिडीओ याच युजरने काढला असावा.

आम्हाला जॉन डर्टिंगच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरही हा व्हिडीओ सापडला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे (भाषांतर) : अलास्कातील माउंट डग्लस ज्वालामुखीच्या शिखरावर एक ज्वालामुखी क्रेटर तलाव आहे, ज्याचा PH 1 आहे, जो मुळात ॲसिड असेल ?? तुमच्या हेलिकॉप्टरमधून पाहायला मिळालेल्या या अविश्वसनीय साहसाबद्दल @rusrobin धन्यवाद ?! ही संपूर्ण ट्रीप चार्टच्या अगदी बाहेर होती आणि अलास्का खरोखरच एक्सप्लोर करण्यासाठी अविश्वसनीय गोष्टींची शेवटची सीमा आहे हे दर्शवते ?

त्यानंतर आम्ही ‘अलास्कातील माउंट डगलस ज्वालामुखी’ हा कीवर्ड सर्च केला, तेव्हा आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही त्याचसारखे दिसणारे फोटो सापडले.

https://www.peakbagger.com/peak.aspx?pid=373

http://www.photovolcanica.com/VolcanoInfo/Douglas/Douglas.html

गूगल मॅप्सवर अपलोड केलेल्या फोटोंवरील व्हिज्युअलमध्ये दाखवल्याप्रमाणे आम्हाला असेच फोटो सापडले.

https://www.google.com/maps/place/Mt+Douglas/@58.86,-153.5333334,3a,75y/data=!3m8!1e2!3m6!1sAF1QipPxFk1Mh4R V8msseEvB6ESW7KAZ4VTcpXuhmSwt!2e10!3e12!6shttps:%2F%2Flh5.googleusercontent.com%2Fp%2FAF1QipPxFk1Mh4RV8msse EvB6ESW7KAZ4VTcpXuhmSwt%3Dw129-h86-k-no!7i1600!8i1059!4m7!3m6!1s0x56c1f664f8a012a1:0x6c9c743e934958e6!8m2!3d58.86!4d-153.5333334!10e5!16zL20vMDRfazE5?entry=ttu&g_ep=EgoyMDI1MDExMC4wIKXMDSoASAFQAw%3D%3D#

निष्कर्ष :

अलास्कातील माउंट डग्लस ज्वालामुखीचा एक व्हायरल व्हिडीओ, ज्यामध्ये ज्वालामुखीचा क्रेटर आहे तो भारतातील कैलास मानसरोवर तलाव म्हणून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check video of mt douglas volcano viral as kailash mansarovar false claim sjr