भारतात रेल्वे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत, अशात लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेल्वेसंबंधित एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळून आले. एक्सवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत काही मुलं रेल्वे ट्रॅकची तोडफोड करताना दिसत आहेत. ही पोस्ट भारतीय रेल्वेचे अधिकृत हँडल आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग करण्यात आली आहे. पण, खरंच अशाप्रकारे काही मुलं भारतात रेल्वे ट्रॅकची तोडफोड करत मोठ्या घातपाताचा प्रयत्न करत तर नाही ना याबाबत आम्ही तपास सुरू केला, यावेळी एक वेगळंच सत्य समोर आलं, हे सत्य नेमकं काय जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

X युजर X Secular ने व्हायरल व्हिडीओ आपल्या हँडलवर शेअर केला.

railway track fact check

इतर सोशल मीडिया वापरकर्तेदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.

railway track fact check
railway track fact check
railway track fact check

तपास :

आम्ही केलेल्या तपासणीदरम्यान व्हायरल व्हिडीओ InVid टूलमध्ये अपलोड करून आणि नंतर व्हिडीओमधून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला मोमेंटिक न्यूज नावाच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला. व्हिडीओ ६ डिसेंबर २०२३ रोजी अपलोड करण्यात आला होता.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे (अनुवाद) : सर, ताज खान पहाटक बोट बेसिन चौकीजवळ अनेक दिवसांपासून रेल्वे मार्गावरील मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. पीएस बोट बेसिनला विनंती आहे की, याच्यावर कारवाई करावी.

कॅप्शनमध्ये वापरण्यात आलेल्या हॅशटॅगवरून हा व्हिडीओ पाकिस्तानचा असल्याचे सुचवण्यात आले आहे.

आम्हाला पाकिस्तानी ट्रेन्स या फेसबुक पेजवर अपलोड केलेला व्हिडीओही सापडला आहे. हा व्हिडीओ ५ डिसेंबर २०२३ रोजी पोस्ट करण्यात आला होता.

व्हिडीओला कॅप्शन दिले आहे (अनुवाद) : सर, ताज खान पहाटक बोट बेसिन चौकीजवळ, रेल्वे मार्गावरील मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. पी.एस बोट बेसिन पोलिसांनी संबंधित प्रकरणावर कारवाई करावी, अशी विनंती आहे.

पाकिस्तानातील कराची येथे बोट बेसिन पोलिस चौकी असल्याचे आम्हाला आढळले.

निष्कर्ष : रेल्वे ट्रॅकच्या तोडफोडीचा पाकिस्तानमधील जुना व्हिडीओ भारताचा सांगून खोट्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.