Samajwadi Party Leader Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. त्यामध्ये समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी जबर मारहाण करून व्हॅनमधून घेऊन जात असल्याचे दिसत आहेत. पण हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबतचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर ओसियन जैन यांनी त्यांच्या प्रोफाइलवर हा व्हिडीओ आणि दावा शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
रिव्हर्स इमेज सर्चमध्ये कोणतेही परिणाम मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही गूगल, तसेच यूट्यूबवर इंग्रजी आणि हिंदीमध्ये कीवर्ड सर्च केले.
यावेळी आम्हाला NYOOOZ UP वर एक व्हिडीओ सापडला.
व्हिडीओ १० डिसेंबर २०२० रोजी पोस्ट केला गेला होता.
व्हिडीओचे शीर्षक होते : ‘पुलिस की पिटाई के बाद भी एसपी कार्यकर्ता यामीन खान लगाता रहा ‘अखिलेश यादव जिंदाबाद’ के नारे
आम्हाला हा व्हिडीओ navbharattimes.com वरदेखील सापडला आहे.
वृत्तात नमूद करण्यात आले आहे : समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे सोमवारी कन्नौज येथे कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जात होते. मात्र, त्यांना राजधानीतच थांबवण्यात आले; पण गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अखिलेश यांना ताब्यात घेतल्याची बातमी पसरताच, सपा कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी निदर्शने सुरू केली. अशाच एका निदर्शनादरम्यान माजी मंत्री मोहम्मद यामीन खानदेखील पोलिसांच्या कारवाईचे बळी ठरले.
निष्कर्ष :
पोलिसांनी सपा नेते यामीन खान यांना मारहाण केल्याचा जुना व्हिडीओ अलीकडील म्हणून शेअर केला जात आहे. व्हायरल व्हिडीओ २०२० चा आहे आणि तो अलीकडील वक्फ विधेयकाशी संबंधित नाही. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.