Uddhav Thackeray Fact Check Video : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाइटहाऊस जर्नलिझमला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे यांचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला व्हिडीओ आढळून आला. ४५ सेकंदांचा व्हिडीओ दोन भागांमध्ये विभागला आहे: पहिल्या भागात ठाकरे गोमांस खाल्ल्याची कबुली देत असल्याचा दावा केला जात आहे, तर दुसऱ्या भागात विविध व्यक्ती त्यांच्याबद्दल त्यांची मते मांडताना दिसत आहेत. या व्हि़डीओमध्ये आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पण, व्हिडीओमागे किती तथ्य आहे हे जाणून घेऊया…
काय होत आहे व्हायरल?
X युजर आशीष नजरने खोटा दावा करत व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील हाच दावा शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओच्या कीफ्रेम्स तपासून तपास सुरू केला. शेअर केलेल्या व्हिज्युअल्सवर एक गोष्ट जी आम्हाला सुरुवातीला लक्षात आली ती म्हणजे स्क्रीनवर लिहिलेले ‘दसरा रॅली लाइव्ह.’
त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणाच्या व्हिडीओचा शोध सुरू केला.
दोन आठवड्यांपूर्वी शिवाजी पार्क, मुंबई येथे झालेल्या यंदाच्या दसरा मेळाव्यातील भाषणाची काही दृश्ये आम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळाली.
व्हिडीओमधील भाषणात २ तास ७ मिनिटांवर ते महाराष्ट्र सरकारने गाईला ‘राज्य माता’ घोषित केल्याबद्दल बोलताना दिसत आहेत.
त्यानंतर ते गौ रक्षकांबद्दल बोलले. व्हिडीओत २ तास ८ मिनिटांवर ते सांगताना ऐकायला येतेय की, हरियाणामध्ये आर्यन मिश्रा नावाच्या मुलाची गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली, पण तो मुस्लीम नाही तर हिंदू असल्यामुळे त्याच्या हत्येची बातमी समोर आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
यानंतर ते केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या गोमांस खाण्याबद्दल कबुली दिल्याच्या जुन्या विधानाबद्दल बोलत आहेत. किरेन रिजिजू यांनी होय, मी गोमांस खातो आणि कोणीही त्यांना रोखू शकत नाही, असे म्हटले होते. त्याच विधानावर उद्धव ठाकरे बोलत होते.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी “तुम्ही गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मुलांना मारहाण करता, पण जो खुलेआम ते खाणे स्वीकारतो, त्याला तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात स्थान देता,’ असा आरोप त्यांनी सत्ताधारी पक्षावर केला.
या सर्व गोष्टींवरून उद्धव ठाकरे गोमांस खातात, अशी कबुली दिल्याचा दावा खोटा असल्याचे सिद्ध होते.
२०१५ मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांचे सहकारी मुख्तार अब्बास नक्वी यांच्या गोमांस खाणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे वक्तव्य केल्याचे अशोभनीय असल्याचे वर्णन केले आणि त्यांना गोमांस खाण्यापासून कोणी रोखू शकेल का असा सवाल केला.
निष्कर्ष :
दसऱ्याच्या वेळी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा एडिटेड व्हिडीओ त्यांनी गोमांस खात असल्याची कबुली दिली या खोट्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे. ठाकरे यांनी अशी कोणतीही कबुली दिली नाही; त्यांचे विधान चुकीच्या पद्धतीने एडिट करून व्हायरल केले जात आहे.