Dr. Babasaheb Ambedkar Voice Clip : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखले जाते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनुयायांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या स्मरणार्थ अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. याच सोशल मीडिया पोस्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधीत एक व्हाईज क्लिप मोठ्याप्रमाणात शेअर केली जात असल्याचे आढळून आले. ज्यात १९३१ मध्ये लंडन येथे झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ आवाजाचा ती व्हॉईस क्लिप असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेकजण ही व्हाईस क्लिप डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या आवाजातील असल्याचे मानत शेअर करत आहेत. पण या व्हाईस क्लिपमागे नेमकं किती तथ्य आहे ते जाणून घेऊ या….
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर सुभाष देसाई यांनी खोटा दावा करत ही क्लिप शेअर केली आहे.
इतर युजर्स देखील तोच दावा करत ती व्हाईस क्लिप शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही तपास सुरू करण्याआधी ती व्हॉईस क्लिप काळजीपूर्वक ऐकली. यातील ऑडिओची क्वालिटी अतिशय स्पष्ट होती आणि बॅकग्राउंडला एकदम हलक्या आवाजात गाणं ऐकू येत होतं.
यावेळी रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला असे आढळून आले की, व्हॉईस क्लिपच्या सुरुवातीला वापरलेली इमेज दुसऱ्या गोलमेज परिषदेतीलच आहे.
त्यानंतर आम्ही क्लिपमध्ये ऐकू येणाऱ्या टेक्स्टवर गूगल कीवर्ड सर्च केले, “My colleague, Rao Bahadur Shrinivasan and I has honour to place before you the point of view of the depressed class of India”.
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?
आम्हाला अनेक वेबसाइटवर तो टेक्स्ट सापडला. यावेळी एका वेबसाइटने, २० नोव्हेंबर १९३० रोजी गोलमेज परिषदेच्या पाचव्या बैठकीतील पूर्ण अधिवेशनातील त्यांचे हे भाषण असल्याचे सुचित केले.
पुढे आणखी सर्च करत असताना, परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण खंड 2’ या पुस्तकातही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे भाषण आढळून आले.
पान ५२९ वर शीर्षकात उल्लेख आहे की: पाचवी बैठक – २० नोव्हेंबर १९३०.
त्यानंतर आम्ही YouTube वर कीवर्ड सर्च करण्यास सुरुवात केली. यावेळी ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण’ आणि ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण चित्रपट/क्लिप’ असे कीवर्ड आम्ही सर्चसाठी वापरले.
यावेळी आम्हाला साल २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा YouTube वर अपलोड झालेला व्हिडीओ सापडला.
त्याची हिंदी आवृत्ती देखील YouTube वर उपलब्ध आहे.
हा चित्रपट जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केला होता.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे व्हायरल होणाऱ्या व्हॉईज क्लिपमधील सेम ऑडिओ या चित्रपटात सुमारे १ तास ३७ मिनिटांनी ऐकू येत आहे.
यावेळी बीबीसी न्यूज इंडिया चॅनलवर अपलोड केलेली बीबीसी न्यूजबरोबरची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शेवटची मुलाखतही आम्ही पाहिली. त्यांची ही ऑडिओ मुलाखत साल १९५५ मधील आहे. पण मुलाखतीत ऐकलेला ऑडिओ हा व्हायरल क्लिपमध्ये शेअर केलेल्या ऑडिओपेक्षा खूप वेगळा असल्याचे आढळून आले.
निष्कर्ष:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या आवाजातील व्हॉईस क्लिप असल्याचा दावा करत व्हायरल होणारी ती क्लिप मूळात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२०००)’ या इंग्रजी चित्रपटातील आहे. त्यामुळे लंडनमध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या आवाजाची ती व्हॉईस क्लिप असल्याचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.