वाढदिवस म्हटल्यावर सेलिब्रेशन हे आलेच. हल्ली केक कापण्याबरोबरच ‘बर्थ डे बम्पस’च्या नावाखाली वाढदिवस असणाऱ्याला मित्रमंडळींकडून चांगलाच चोप मिळतो. मात्र अशाप्रकारचा एक व्हिडिओ मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या मुलाचा वाढदिवस असून त्या मुलाला त्याच्या मित्रांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या मजकूरासहीत व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वाढदिवस असणाऱ्या एका मुलाला त्याचे मित्र केक कापण्याआधी अगदी जमीनीवर पडेपर्यंत ‘बर्थ डे बम्पस’ देत मारहाण करताना दिसतात. या व्हिडिओतील मुलाचा ‘बर्थ डे बम्पस’च्या नावाखाली झालेल्या मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचे सांगत तो व्हायरल केला जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि एका तेलगू वृत्तवाहिनीनेही याच मजकूरासहित हा व्हिडिओ सेअऱ केला आहे. सेहवागने ट्विटवर शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करुन या मुलाच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

मात्र फेसबुकने प्रमाणित केलेल्या इंडिया टुडे अॅण्डी फेक न्यूज वॉर रुमने (एएफडब्यूए) केलेल्या तपासामध्ये या व्हिडिओसंदर्भात करण्यात आलेला दावा खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण झालेला मुलगा जिवंत असून त्यानेच इंडिया टुडेला ही माहिती दिली आहे. सेहवागने शेअर केलेल्या व्हिडिओखालीही या मुलाच्या एका मित्राने हा मुलगा जिवंत असल्याचे म्हटले आहे. ‘सर हा मुलगा जिवंत आहे. ही शंभर टक्के खोटी बातमी आहे. हा मुलगा आमच्या हॉस्टेलमध्ये राहतो. प्लिज हा व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट करा सर,’ असे ट्विट रघुराज सिंग या ट्विटर युझरने सेहवागच्या ट्विटला उत्तर देताना केले आहेत.

सेहवागला दिलेले उत्तर

इंडिया टुडेने या रघुराज सिंगचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. फेसबुवरील प्रोफाइलवरुन त्याच्याशी संपर्क झाला असता तो किरगिझस्तान देशाची राजधानी असणाऱ्या बिश्केक शहरातील असल्याचे समजले. मात्र रघुराजने फेसबुवरील कोणत्याही मेसेजला रिप्लाय केला नाही. त्यानंतर रघुराजच्या प्रोफाइलवरुन त्याच्या कॉलेजमधील दिपक अंजना या मित्राशी संपर्क साधला असता त्याने या व्हिडिओबद्दलची माहिती दिली. दिपकने हा व्हिडिओ त्यांच्या कॉलेज ग्रुपमधील एका मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

या व्हिडिओमध्ये ज्या मुलाला ‘बर्थ डे बम्पस’ दिले जात आहेत आणि ज्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे त्याच्याकडे ‘इंडिया टुडे’ने या व्हिडिओ प्रकरणासंदर्भात चौकशी केली. त्यावेळी हा व्हिडिओ २०१८ डिसेंबरचा असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आपल्याला खूप त्रास होत असून आपण मानसिक तणावाखाली असल्याचं त्याने सांगितले आहे. कॉलेजनेही हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असून सर्व विद्यार्थ्यांना क्लीनचीट दिली आहे. या मुलानेही सोशल नेटवर्किंगवर जिथे जिथे त्याला हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे तिथे कमेंट करुन हा व्हिडिओ खोटा असून मी जिवंत आहे अशा कमेंट करताना दिसत आहे.

अर्थात अशाप्रकारे वाढदिवस साजरा करण्याने एखाद्याला नक्कीच इजा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र अशा घटनांचे व्हिडिओ खोट्या माहितीसहीत व्हायरल झाल्यास व्हिडिओमधील व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो हे सर्वांनीच असे व्हिडिओ फॉरवर्ड करण्याआधी विचारात घ्यायला हवे.