Uttar Pradesh Fact Check Viral Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही फोटोंचा कोलाज मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, ज्यात फोटोंसह उत्तर प्रदेशातील एका मदरशावर छापेमारी करून मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या छाप्यात पोलिसांना मशीनगन मिळाल्याचा दावाही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण, खरंच हा व्हिडीओ भारतातील आहे का? तसेच या व्हिडीओचा २०१९ च्या घटनेशी नेमका काय संबंध आहे जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
canada changes in immigration policy
कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतीयांना धक्का; आता कॅनडात नोकरी मिळणे कठीण; कारण काय?
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…

X युजर सन्नी भारत NAMO ने व्हायरल फोटो आपल्या प्रोफाइलवर शेअर केलेत.

fact check machine gun recovered from uttar pradesh bijnor madrasa
उत्तर प्रदेशात मदरशातील शस्त्रांच्या कारखान्यावर पोलिसांची छापेमारी फॅक्ट चेक

इतर वापरकर्तेदेखील हाच दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

uttar pradesh bijnor madrasa (1)
uttar pradesh bijnor madrasa
uttar pradesh bijnor madrasa (3)

आम्हाला ही पोस्ट व्हॉट्सॲपवर प्रसिद्ध होत असल्याचेदेखील आढळले.

तपास :

आम्ही एकामागून एक फोटोंवर रिव्हर्स इमेज चालवून आमचा तपास सुरू केला.

चित्र १:

आम्ही पहिल्या फोटोवर रिव्हर्स इमेजचा शोध घेतला.

आम्हाला ते फोटो वार्ता भारतीच्या वेबसाईटवर मिळाले. २०१८ मध्ये या फोटोंसह अपलोड केलेल्या बातमीचे शीर्षक होते : पीएफआय स्टॉक ऑफ स्वॉर्ड्स म्हणून सोशल मीडियावर सिख किरपाण कारखान्याचे खोटे फोटो पसरवले गेले.

बातमीत नमूद केले आहे की : तलवारीच्या कारखान्याच्या फोटोंच्या मूळ शोधात मीडिया टीम पंजाबमधील पटियाला जिल्ह्यात पोहोचली. खालसा किरपान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक शीख तलवार कारखान्यातून फोटो घेतले गेल्याचे आढळून आले. कारखान्याचे मालक बच्चन सिंग यांनी आठवण करून दिली आणि पुष्टी केली की, हे फोटो त्यांच्या गोदामाचे आहेत आणि ते काही वर्षांपूर्वी त्यांच्या कारखान्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गटातील एका व्यक्तीने घेतले होते.

चित्र २:

गुजरात पोलिसांनी राजकोट-अहमदाबाद महामार्गावरील एका दुकानावर छापा टाकला आणि शस्त्रे जप्त केली, तेव्हा म्हणजे २०१६ मधील हे फोटो असल्याचे आम्हाला आढळले.

uttar pradesh bijnor madrasa
uttar pradesh bijnor madrasa

गुजरात हेडलाइनने ५ मार्च २०१६ रोजी प्रकाशित केलेल्या एका वृत्तात व्हायरल फोटोतील शस्त्रासारखाच एक संग्रह टेबलवर दिसत आहे.

image.png

ही पोस्ट आता हटवली गेली आहे, परंतु आम्ही २०२९ मध्ये प्रकाशित केलेल्या तथ्य तपासणींपैकी एकाद्वारे स्क्रीनशॉट प्राप्त केला आहे.

चित्र ३ :

image.png

आम्ही या फोटोंचा रिव्हर्स फ्रेम सर्चद्वारे शोध घेतला, त्यावेळी २९ जुलै २०१९ रोजी शामली पोलिसांनी केलेल्या पोस्टमधील हा फोटो सापडला.

https://twitter.com/shamlipolice/status/1155762223555366912

पोस्टमध्ये म्हटले आहे की : शामली पोलिसांनी चार परदेशी आणि तीन वेगवेगळ्या मदरशांतील तीन मोहतमीम/मदरसा संचालकांसह सात संशयितांना अटक केली. बेकायदेशीर कागदपत्रे, भारतीय आणि विदेशी चलन आणि अनेक मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.

चित्र ४ :

हा फोटो ५ मार्च २०१६ रोजी गुजरात हेडलाइनमधील एका लेखातही दिसला.

चित्र ५:

रिव्हर्स इमेज सर्चदरम्यान असे आढळून आले की, अनेक सोशल मीडिया पेजेसवर पाहिल्याप्रमाणे हे फोटोदेखील २०१९ चे असल्याचे दिसले आहे. या फोटोचा हा सर्वात जुना ठसा Tumblr वर सापडला. पोस्ट आता हटवण्यात आली आहे.

चित्र ६ :

uttar pradesh bijnor madrasa

हा फोटोदेखील राजकोट डिटेक्शन ऑफ क्राइम ब्रँच (DCB) आणि कुवाडावा पोलिसांच्या नेतृत्वाखालील ऑपरेशनचा होता. गुजरात हेडलाईन न्यूजमध्ये नमूद केल्याप्रमाणे राजकोट अहमदाबाद महामार्गावरील चोटिला जवळील एका हॉटेलमधून बेकायदा शस्त्रास्त्रांच्या व्यापाराचा या टीमने पर्दाफाश केला. पार्श्वभूमीत पूर्वीच्या फोटोंमध्ये दिसल्याप्रमाणे तेच टेबल दिसत आहे.

त्यानंतर आम्ही दाव्यावर कीवर्ड शोध घेतला, ज्यामध्ये असे म्हटले आहे : मदरसा येथे छाप्यात सापडलेली शस्त्रे. बातमी खरी असली तरी २०१९ ची आहे.

https://www.business-standard.com/article/pti-stories/weapons-recovered-from-madrasa-in-up-6-detained-119071001362_1.html

बिझनेस स्टँडर्डवरील अहवालात म्हटले आहे : येथील एका मदरशातून पोलिसांनी शस्त्रे जप्त केल्यानंतर सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. याबाबत मंडळ अधिकारी (सीओ) कृपाशंकर कन्नौजिया यांनी एका गुप्त माहितीच्या आधारे सांगितले की, शेरकोट भागातील कंधला रोडवरील मदरसा दारूल कुराण हमीदिया येथे दुपारी छापा टाकण्यात आला.

निष्कर्ष : मदरशात शस्त्रे जप्त केल्याची २०१९ मधील जुनी बातमी आणि त्याच्याशी संबंध नसलेले अनेक फोटो अलीकडचे असल्याचा दावा करत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मदरशात शस्त्रांचा मोठा सापड्याचे दावे करणारे व्हायरल फोटो दिशाभूल करणारे आहेत.