लाइटहाऊस जर्नलिझमला भीषण आगीच्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. हा व्हिडीओ इजिप्तमधील कैरो विमानतळावर विमान लँडिंगदरम्यान झालेल्या अपघाताचा असल्याचा दावा केला जात आहे, इतकेच नाही तर या अपघातात १५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यावरुन आता अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहे, त्यामुळे हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर Tanvir Rangrez ने व्हिडिओ व्हायरल दाव्यासह आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
flights affected by bomb threat
वाढत्या विमान धमक्यांचा ५१० उड्डाणांवर परिणाम…धमकीखोरांच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना? किती परिणामकारक?

या पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन पाहा.

https://archive.ph/rbhBZ

इतर युजर्सही हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओमधून कीफ्रेम मिळवल्या आणि व्हिडिओबद्दल अधिक तपशील मिळविण्यासाठी Google रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध सुरु केला.

कीफ्रेमवर अशाच एका गूगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला YouTube वर तीन वर्षांपूर्वी पोस्ट केलेला एक व्हिडिओ सापडला. ज्यामध्ये ‘इस्माईलिया रोडवर पाईप एक्स्प्लोशन – कैरो – १४ जुलै २०२०’ असे दाखवण्यात आले होते.

त्यानंतर आम्ही गूगल वर कीवर्ड शोध घेतला. यावेळी १४ जुलै २०२० रोजी आयडेंटिटी मॅगझिनच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेला व्हिडिओ आम्हाला आढळला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे: तेल पाइपलाइनच्या स्फोटामुळे कैरो-इस्मालिया वाळवंट रस्त्यावर मोठी आग लागली. यावेळी घटनास्थळी असलेल्या गाड्यांना मोठा फटका बसल्याचे दिसत आहे आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २० गाड्या दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कृपया यावेळी आगीच्या ठिकाणी जाणारे सर्व रस्त्यांचा वापर टाळा आणि सुरक्षित रहा! व्हिडिओ क्रेडिट: मोहम्मद अब्देलफत्ताह

याबाबतचे एक वृत्तही आम्हाला आढळले. इजिप्त टुडे वर १४ जुलै २०२० रोजी अपलोड केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, ‘इस्मालिया डेझर्ट रोड येथे पेट्रोलियम पाइपलाइनच्या गळतीमुळे मंगळवारी अचानक स्फोट झाला, ज्यामुळे अनेक जण जखमी झाले. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, मंत्री तारेक अल मोल्ला स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आहे, अपघाताची कारणे शोधण्यासाठी तपास सुरु केला जाईल.’

https://www.egypttoday.com/Article/1/89682/Petroleum-pipeline-explosion-at-Ismailia-Desert-Road-Prime-Minster-follows

आम्हाला Xinhua Net वर देखील एक बातमी सापडली.

http://www.xinhuanet.com/english/2020-07/15/c_139212669.htm

इजिप्तमध्ये अलीकडे काही विमान अपघात झाले आहेत का ते देखील आम्ही तपासले. आम्हाला अशी माहिती देणारी कोणतीही बातमी सापडली नाही.

निष्कर्ष: इजिप्तमधील इस्माइलिया डेझर्ट रोड येथे पाइपलाइन स्फोटाचा व्हिडिओ इजिप्तमधील विमान अपघाताचा असल्याचे सांगून आता व्हायरल केला जात आहे. व्हायरल झालेला दावा खोटा आहे.