उत्तराखंडमधील हलद्वानी जिल्ह्यात बनभुलपुरा भागात मलिक बागेजवळ एका अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर, पोलिसांवर आणि या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्री घडली. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर जमाव आणखी आक्रमक झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक फोटो व्हिडीओ समोर आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान एका व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे ज्यामध्ये पोलीस लोकांचा पाठलाग आणि लाठीचार्ज करताना दिसत आहे. लोक इकडे तिकडे धावताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा हलद्वानीमधील हिंसाचार असल्याचा केला जात असून हा दावा खोटा आहे. तपासाअंती हा व्हिडिओ उत्तराखंडमधील हल्दवानी येथील नसून मुंबईच्या घाटकोपरमधील असल्याचे आढळून आले. मुंबईतील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा व्हिडिओ सध्या हलद्वानी हिंसाचार म्हणून शेअर केला जात आहे.

कोणता व्हिडीओ होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज SADA News Network ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर पोस्ट केला.

इतर वापरकर्ते देखील हा व्हिडिओ विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

काय सांगतो तपास:

InVid टूलवर व्हिडिओ अपलोड करून तपास सुरू केला. InVid टूलमधून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज शोधला,

शोधा दरम्यान एक विशिष्ट फ्रेम सापडली. ही फ्रेम फेसबुकवर शेअर केलेल्या रीलची होती. रील उघडली नसली तरी, व्हिडिओवर लिहिलेला मजकूर आम्ही बघू शकलो. त्यात ‘मुंबई पोलिसांनी मध्यरात्री घाटकोपरला गोळीबार केला’ असे लिहिले होते.

प्राप्त केलेल्या कीफ्रेमवर इनव्हीड टूल्स, ‘मॅग्निफायर’ वापरून, आम्हाला आढळले की व्हिडिओमधील वाहनांच्या नोंदणी प्लेट्स ‘MH’ ने सुरू झाल्या आहेत, ज्या उत्तराखंडच्या नसून महाराष्ट्राच्या आहेत.

हेही वाचा – ३७ भारतीय सैनिकांना जिवंत जाळल्याचा भीषण दावा व्हायरल; मूळ वास्तवही भयंकर, पाहा Video ची खरी बाजू

मौलाना मुफ्ती सलमान अझरी यांच्या अटकेनंतर घाटकोपरमध्ये तणाव निर्माण झाल्याचे मराठीतील एक बातमीमध्ये आढळले.

आम्हाला मिरर नाऊ यूट्यूब चॅनेलवर एक बातमी आढळली. मिळालेल्या काही कीफ्रेम व्हिडिओशी जुळल्या.

व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मौलाना मुफ्ती सलमान अझारी यांना ‘हेट स्पीच’साठी अटक करण्यात आली आहे, पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन’. असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ घाटकोपरचा असल्याचा दावा करणारा व्हिडिओही ट्विटरवर सापडला आहे.

हेही वाचा – बॅरिकेड्स मोडणार, अश्रुधुरही पडेल फिका, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे ट्रॅक्टर पाहून धक्काच बसेल; पण थांबा, खरं काय बघा

प्रेस टाइमच्या Facebook पेजवर एक चांगला, स्पष्ट व्हिडिओ सापडला. व्हिडिओ ८ फेब्रुवारी २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता.

मिड डेच्या X प्रोफाईलवर हिंसाचाराचे काही व्हिडिओ आणि त्याबद्दलचे काही वृत्त देखील सापडले.

निष्कर्ष:

पोलिसांच्या लाठीचार्जचा व्हायरल व्हिडिओ हा उत्तराखंड येथील हलद्वानी येथील असल्याचा खोटा दावा केला जात आहे, हा व्हिडीओ प्रत्यक्षात महाराष्ट्रातील मुंबईमधील घाटकोपरचा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check viral video of lathi charge not from haldwani in uttarakhand but from mumbai know what is truth snk