अंकिता देशकर.
Fact check: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ खरे असतात तर काही खोटे आणि लोकांची दिशाभूल करणारे असतात. शिवाय एखादा मोठा सण आला की त्याच्याशी संबंधित असेच दिशाभूल करणारे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच देशभरातील लोकांनी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरे केला. याच सणाच्या निमित्ताने एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये क्यूआर कोडच्या स्वरूपात मेहंदी काढल्याचं दाखवण्यात आले होते. तसेच या मेहंदीद्वारे पेमेंट करणं शक्य असल्याचंही व्हिडीओत दाखविण्यात आले होते. त्यामुळे हा व्हिडिओ खरा समजून अनेकजण तो शेअर करत होते. आमच्या तपासात हा व्हिडिओ एडिटेड असल्याचे समजले, जो लोकं खरा समजून व्हायरल करत होते. मात्र, लाईटहाऊस जर्नलिजमने या व्हायरल व्हिडीओचे फॅक्ट चेक केले असता इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओत QR कोड संबंधित केला जाणारा दावा खोटा असल्याचं उघडकीस आलं.
नेमकं काय होत आहे व्हायरल?
ट्विटर युजर Divyanshu Kaushik ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
कॅप्शन मध्ये लिहले होते, ‘Peak Digital India moment’. या पोस्टचा संग्रहीत व्हर्जन इथे बघा.
इतर सोशल मीडियावर वापरकर्ते देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.
हा व्हिडिओ व्हाट्सअँप वर देखील मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे.
तपास –
व्हायरल होणारा व्हिडिओ आम्ही डाउनलोड करून आणि InVid टूलमध्ये अपलोड करून आमचा तपास सुरू केला त्यातून आम्हाला काही किफ्रेम्स मिळाल्या त्यानंतर आम्ही स्क्रीनवर एक-एक करून रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यावेळी आम्हाला हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम प्रोफाइलवर मिळाला, ‘mahendi_roaringlionart’.
या व्हिडिओचे क्रेडिट्स दुसऱ्या एका इन्स्टाग्राम प्रोफाईल, ‘yash_mehndi’ ला देण्यात आले होते. कॅप्शन मध्ये लिहले होते: It’s just a content i edit this payment transaction screen recording with my mehndi video to make it real but may be mehndi QR code can not be use for payments It’s just for fun
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही ‘yash_mehndi’ या पेजबरोबर संपर्क साधला ज्याने आम्हाला फोनवरून कळवले की मेहेंदीमधील QR कोड वापरून पेमेंट करण्याचा व्हिडिओ डिजिटल पद्धतीने एडिट केला गेला आहे. मेहेंदीमध्ये तयार केलेल्या क्यूआर आर्टचा वापर करून कोणतेही पेमेंट केले गेले नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
निष्कर्ष: मेहेंदी वापरून हातावर काढलेला QR कोड वापरून डिजिटल पेमेंटचा व्हायरल व्हिडिओ डिजिटली एडिट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या निर्मात्याने मान्य केले की त्याद्वारे कोणतेही पेमेंट केले गेले नाही.