Fact Check : क्षत्रिय करणी सेनेने म्हटले आहे की, तुरुंगात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नाईला मारेल जो कोणी पोलिस कर्मचारी चकमकीत मारेल त्याला १.११ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडिओद्वारे याची घोषणा केली. राज शेखावत यांच्या घोषणेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. १.११ कोटी देण्याच्या घोषणेनंतर लोकांनी करणी सेनेच्या प्रमुखाला मारहाण केल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. याविषयी लाइटहाऊस जर्नलिझमने सत्य तपासण्याचा प्रयत्न केला.

तपासादरम्यान, लाइटहाऊस जर्नलिझमला असे आढळले की हा दावा दिशाभूल करणारा आहे आणि व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे.

Dr Richard Chang, founder of SMIC
चीनच्या मदतीला(ही) चँग!
Daily Horoscope 25th October in Marathi
Today’s Horoscope, 25 October : पंचांगानुसार आजचा शुभ…
The case revolved around the the alleged assassination plot of pro-Khalistan separatist Gurpatwant Singh Pannun.
अमेरिकेने आरोप केलेला ‘रॉ’चा गुप्तचर अधिकारी विकास यादव आहे तरी कोण?
Vikas Yadav
Vikash Yadav: पन्नूनच्या हत्येच्या कटात भारत सरकारच्या कर्मचाऱ्याचा सहभाग- अमेरिकेचा आरोप; दिल्लीत यादवला अटक का करण्यात आली होती?
icc likely to issue arrest warrant against benjamin netanyahu
इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूंच्या घरावर ड्रोन हल्ला; हमासच्या नेत्याची हत्या होताच मोठी घडामोड
businessman targeted by cybercriminals and his friend attempted to extort ₹25 lakhs
खंडणीसाठी मित्राने पातळी सोडली, झाले असे की …
Husband Killed His Wife Over Instagram Reels
Crime News : Instagram रिल्स पोस्ट करण्यावरुन वाद झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या, कुठे घडली ही घटना?
Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही

काय होत आहे व्हायरल?

X यूजर तीर्थराज मिश्राने एक दिशाभूल करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

इतर यूजर्स देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.

हेही वाचा : VIDEO: पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? कोल्हापुरच्या रिक्षा चालकानं लिहलं भन्नाट उत्तर; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

तपास:

लाइटहाऊस जर्नलिझमने व्हिडिओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर क्रॉस इमेज सर्च करत तपास केला

क्रॉस इमेज सर्चमुळे लाइटहाऊस जर्नलिझमला punjabkesari.in वरील बातम्या दिसल्या

https://m.punjabkesari.in/national/news/karni-sena-leader-shekhawat-arrested-before-protesting-at-bjp-headquarters-1964748

९ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या य बातम्यांमध्ये असे सांगितले आहे की करणी सेनेचे नेते शेखावत यांना भाजप मुख्यालयात निदर्शने करण्यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. या वृत्तांमध्ये असे सांगितले आहे की करणी सेनेचे नेते राज शेखावत, जे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) गांधीनगर येथील मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी जात होते, त्यांना मंगळवारी अहमदाबाद विमानतळाबाहेर पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज शेखावत केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी राजपूत समाजाविषयी केलेल्या टिकेवर आणि पक्षाने त्यांना राजकोट लोकसभा जागेसाठी उमेदवार म्हणून उतरवण्यास नकार दिल्याचा ते निषेध करत होते.

लाइटहाऊस जर्नलिझमला घटनेबद्दल इतर अनेक बातम्या आढळल्या. या बातम्यांतील छायाचित्रे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या फोटोंसारखीच होती.

https://www.etvbharat.com/hi/!bharat/karni-sena-chief-raj-shekhawat-detained-at-ahmedabad-airport-hin24040902355

लाइटहाऊस जर्नलिझमला टीव्ही 9 गुजराती च्या यूट्यूब चॅनेलवर घटनेचा एक व्हिडिओ रिपोर्ट सुद्धा सापडला आहे.

https://www.ahmedabadmirror.com/karni-sena-leader-detained-for-9-hours-to-avoid-unrest/81865053.html#goog_rewarded

https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/karni-sena-chief-held-before-protest-at-kamalam/articleshow/109176867.cms

लाइटहाऊस जर्नलिझमला एक पोस्ट देखील सापडली ज्यामध्ये झी २४ कलंकच्या एक्स हँडलवर व्हायरल व्हिडिओ दाखवला आहे.

हेही वाचा : “आमच्या मुलाचे लग्न…” पुण्यात मुलाला स्थळ आणणाऱ्यांसाठी पालकांनी घराबाहेर लावली भन्नाट पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

निष्कर्ष:

करणी सेनेचे प्रमुख राज शेखावत यांना अहमदाबाद विमानतळावर ताब्यात घेतल्याचा जुना व्हिडिओ लॉरेन्स बिश्नोईच्या हत्येसाठी बक्षीस जाहीर केल्यानंतर चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जात आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.