Viral Video : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर बांगलादेशातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशात कोणते व्हिडीओ खरे आहे आणि कोणते व्हिडीओ खोटे आहे, हे तपासणे कठीण जात आहे. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक जमाव इमारतीवर चढून काही लोकांवर आणि त्यांच्या घरांवर हल्ला करत असल्याचा दिसत आहे. सोशल मीडियावर काही युजर्सनी हा व्हिडीओ शेअर करत बांगलादेशातील हिंदूंवर आणि त्यांच्या घरांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. हे खरंय का, आज आपण जाणून घेऊ या.

लाइटहाऊस जर्नलिझमला हा व्हिडीओ सोशल मीडिया दिसला. या व्हिडीओमध्ये एक जमाव इमारतीवर चढून काही लोकांवर हल्ला करत आहे, तर काही लोक इमारतीखाली जमलेले दिसत आहे. बांगलादेशात हिंदूंवर अशाच प्रकारे हल्ले करण्यात आल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. या व्हिडीओबाबत लाइटहाऊस जर्नलिझमने तपास केला आणि त्यांना तपासादरम्यान समजले की या व्हिडिओमध्ये हिंदूंवर हल्ला करण्यात आलेला नाही, तर एका पोलीस स्टेशनवर हल्ला करण्यात आला आहे.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”

काय होत आहे व्हायरल?

युजर याती शर्माने हा व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह एक्स वर शेअर केला.

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे पहा.

https://archive.ph/XPeqF

हेही वाचा : रस्त्यावर स्टंटबाजी करीत रील बनवणे तरुणाला भोवले, लोकांनी स्कुटी उचलली अन्…; पाहा धक्कादायक Video

इतर युजर्स देखील असाच दावा करत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास –

लाइटहाऊस जर्नलिझमने InVid टूलमध्ये हा व्हिडिओ अपलोड केला आणि याबाब तपास केला त्यानंतर मिळवलेल्या अनेक किफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले.

रिव्हर्स इमेज सर्च दरम्यान त्यांनी बीडी न्यूज 24 या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला हा व्हिडिओ आढळला.

डिस्क्रिप्शन मध्ये म्हटले आहे : एक पोलीस अधिकारी
टोळीच्या तावडीत सापडला. बीडी न्यूज ट्वेंटी फोर.

हा व्हिडीओ चॅनेल वर दहा दिवसांआधी अपलोड करण्यात आला होता.

या व्हिडिओचा वापर करून, लाइटहाऊस जर्नलिझमने किफ्रेमवर आणि गूगल लेन्स आणि गूगल ट्रान्सलेट द्वारे रिव्हर्स इमेज सर्च केले, तेव्हा .या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बोर्डवर बांगलादेश पोलीस लिहिलेय.

आणखी सर्च केल्यावर LinkedIn वरील एक व्हिडिओ देखील सापडला.

https://www.linkedin.com/posts/sazzad-hossain-a29a8b134_%E0%A6%9C%E0%A6%A8%E0%A6%A4%E0%A6%B0-%E0%A6%86%E0%A6%95%E0%A6%B0%E0%A6%B6-activity-7226823648966275072-BuV3?utm_source=share&utm_medium=member_desktop

या व्हिडिओला कॅप्शन दिले होते – सार्वजानिक आक्रोश.

तसेच, या व्हिडीओवरील दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ वनप्लसवर ५ ऑगस्ट २०२४ रोजी १७:२५ मिनिटांनी शूट करण्यात आला.

लाइटहाऊस जर्नलिझमला व्हिडिओमध्ये एक शॉपफ्रंट सापडला जो एका बँकेचा होता. गुगल लेन्स वापरल्यावर, लाइटहाऊस जर्नलिझमला बोर्डवर (SBAC Bank Plc असे लिहिलेले दिसून आले

ही माहिती वापरून त्यांनी गुगल मॅपवर पत्ता तपासला.
लाइटहाऊस जर्नलिझमला गुगल मॅपवर नेमके ठिकाण सापडले आणि नकाशांवर पोलिस स्टेशनचा बोर्ड सापडला.
पोलीस स्टेशनच्या फलकावर गुगल लेन्स वापरून लाइटहाऊस जर्नलिझमला हा व्हिडीओ नेमका कुठला, हे कळले. त्यानंतर त्यांनी बांगला भाषेतील कीवर्ड वापरून फेसबुक कीवर्ड शोध घेतला.

https://www.facebook.com/100060953607154/videos/3840122206212560/

लाइटहाऊस जर्नलिझमने बांगलादेशातील एक वरिष्ठ फॅक्ट चेकर तौसिफ अकबर यांच्याशी देखील संपर्क साधला, ज्यांनी सांगितले की, “खाली काढण्यात आलेल्या साइनबोर्डवर बांगलादेश पोलिस लिहिलेले आहेत. हे स्पष्ट आहे की या व्हिडिओमध्ये पोलिस स्टेशनवर हल्ला केला जात आहे आणि तोडफोड केली जात आहे “

निष्कर्ष – बांगलादेशात एका पोलीस स्टेशनवर हल्ला आणि तोडफोड झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करून देशातील हिंदूंवर हल्ले होत असल्याचा दावा करून खोटा प्रसार केला जात आहे. त्यामुळे हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.