Fact check WHO has not unveiled global police force : करोना महासाथीच्या उद्रेकानंतर आता कुठे जग सावरले आहे तोच या विषाणूचे नवीन उपप्रकार समोर येत आहेत. दरम्यान, आणखी एक महासाथ जगाच्या उंबरठय़ावर येऊ घातली आहे. २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या संभाव्य आजाराला ‘एक्स’ असे नाव दिले आहे. ‘‘डिसीज एक्स’चा कारक घटक हा करोना विषाणूपेक्षा २० पट अधिक घातक असेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जगात महासाथ घडवू शकेल, असा संभाव्य अनोळखी आजार म्हणून त्याचे नामकरण ‘‘डिसीज एक्स’ करण्यात आले. त्यामुळे मानवी आजाराला कारणीभूत ठरू शकेल, अशा अनोळखी पॅथोजन एक्सचा शोध संशोधक घेत आहेत.

दरम्यान, या आजाराबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स'( ट्विटर)वर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. या पोस्टमध्ये असा दावा केला जात होता की, “‘जागतिक आरोग्य संघटनेने’ ( WHO)ने’ ‘डिसीज एक्स’बाबत चर्चा करणाऱ्या स्वतंत्र मीडिया, ऑनलाइन पोस्ट करणाऱ्या नागरिकांना अटक करण्यासाठी ‘जागतिक पोलिस दला’ची स्थापना केली आहे.” काही पोस्ट्सचा स्क्रीनशॉट देखील या ट्विटसह शेअर करण्यात येत आहे, ज्यामध्ये ‘द पीपल्स व्हॉइस’ वर प्रकाशित लेखाचा स्क्रीनशॉट येथे वापरण्यात आला होता.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

या दाव्याचा तपास केल्यानंतर तो खोटा असल्याचे निष्पन्न झाले. WHO ने डिसीज एक्स’बाबत चर्चा करणाऱ्यां नागरिकांना अटक करण्यासाठी जागतिक पोलीस दलाची स्थापना केलेली नाही.

‘एक्स’ रोग (‘Disease X’) हे एक तात्पुरते नाव आहे जे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांच्या ब्ल्यूप्रिंट प्राधान्य रोगांच्या यादीमध्ये स्वीकारले होते. हा एक काल्पनिक, अज्ञात रोगकारक आहे ज्यामुळे भविष्यात महामारी होऊ शकते.

काय होत आहे व्हायरल पोस्ट?

X युजर Tracey Mackin नावाच्या अकांउटवर ही व्हायरल पोस्ट शेअर करण्यात आली आहे ज्यामध्ये ‘डिसीज एक्स’बाबत चर्चा करणाऱ्या नागरिकांच्या अटकेसाठी डब्ल्यूएचओने केली जागतिक पोलिस दलाची स्थापना केल्याचा दावा करण्यात आला होता.

या दाव्या संदर्भातील इतर व्हायरल पोस्टची संग्रहित यादी तुम्ही येथे पाहू शकता.

सोशल मीडियावर व्हायरल सर्व पोस्टमध्ये इतर वापरकर्ते देखील तोच दावा केल्याचे दिसते आहे.

तपास काय सांगतो?

हा दावा खरा आहे की खोटा याबाबत तपास करण्यासाठी असा दावा करणाऱ्या बातम्या इंटरनेटवर आहेत का याचा शोध घेतला परंतू असा दावा कोणत्याही विश्वसनीय वृत्तसंस्थेद्वारे केल्याचे तपासामध्ये आढळले नाही

त्यानंतर व्हायरल स्क्रीनशॉटद्वारे लेखाचा ऑनलाइन मागोवा घेतला आणि ‘TrustServista’ या क्रोम एक्स्टेंशनद्वारे तपासला. हे टुल विशिष्ट वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या लेखाची विश्वासार्ह पातळी तपासतो. या प्रकरणात विश्वासार्ह पातळी फक्त ‘३५%’ होती, म्हणजे स्क्रीनशॉटमधील लेखावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.

WHO Unveils ‘Global Police Force’ To Arrest Citizens Who Post Independent Media Online

त्यानंतर WHOच्या वेबसाइटवर नमूद केलेल्या मीडिया चौकशी विभागाद्वारे WHOच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, “व्हायरल दावा खोटा आहे.” WHO च्या म्हणण्यानुसार, “पोस्टमध्ये १७ जानेवारी २०२४ रोजी दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये WHOचे महासंचालक डॉ टेड्रोस ॲडहानॉम गेब्रेयसस यांनी डिसीज एक्स’ आणि साथीच्या तयारीवर केलेल्या चर्चेचा संदर्भ देत आहे.”

हेही वाचा – ३७ भारतीय सैनिकांना जिवंत जाळल्याचा भीषण दावा व्हायरल; मूळ वास्तवही भयंकर, पाहा Video ची खरी बाजू

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, डब्ल्यूएचओ सदस्य देश सध्या वाटाघाटी करत असलेल्या साथीच्या कराराचा देखील चुकीचा अर्थ या पोस्टमध्ये लावण्यात आला आहे.

मेलद्वारे डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने डिसीज एक्स’ अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी दुवे देखील शेअर केले आहेत.

वेबसाइटनुसार, ‘WHO R&D ब्लूप्रिंटने SARS-CoV-2 जागतिक महामारी आणि इतर अलीकडील उद्रेक दरम्यान शिकलेले वैज्ञानिक धडे लागू करण्यासाठी चर्चासत्र आयोजीत केली आहे ज्यामुळे भविष्यातील साथीच्या रोगांसाठी सक्षम अज्ञात एजंट्सच्या संशोधन गरजा पूर्ण करण्यासाठी – पॅथोजेन एक्सचा शोध संशोधक घेत आहेत.

हेही वाचा – मी जाणार नाही अन् तुलाही…”; पुण्याच्या तरुणीने अडवली रिक्षाची वाट, रिक्षचालकाला शिकवला धडा

निष्कर्ष:

डब्ल्यूएचओने स्वतंत्र मीडिया ऑनलाइन पोस्ट करणाऱ्या नागरिकांना अटक करण्यासाठी ‘जागतिक पोलिस दलाची स्थापना केली, असे सांगणारा व्हायरल दावा खोटा आहे.