viral video shows woman shot the rapist : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज मजेशीर, भीतीदायक, थक्क करणारे असे काहीतरी हृदयस्पर्शी व्हिडीओ व फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत असतात. योगायोगाने हे व्हिडीओ, फोटो सध्याच्या चर्चित विषयांना व मुद्द्यांशी जोडलेले असतात. पण, हे व्हिडीओ किंवा फोटो खरे आहेत की खोटे याची पडताळणी न करताच आपण ते सर्रास रिपोस्ट करीत जातो. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आईने आपल्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला नराधमावर कोर्टात गोळ्या झाडल्या आहेत. यामागे नक्की काय सत्य अन् काय खोटं ते आपण प्रस्तुत लेखातून सविस्तर जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

सोशल मीडियाच्या @RealBababanaras या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मारियान बाचमेयर नावाची एक महिला आहे, जिने तिच्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला नराधमावर कोर्टात गोळ्या झाडल्या आहेत. त्यानंतर तिला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षासुद्धा सुनावण्यात आली आहे, असा दावा कॅप्शनमधून केला जात आहे. पण, हे प्रकरण खरंच घडलं आहे का? तर नाही… कारण- तपासादरम्यान आम्हाला हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. व्हायरल झालेला व्हिडीओ खऱ्या घटनेचा नसून, ‘नो टाइम फॉर टियर’ या जर्मन चित्रपटातील घटनेच्या पुनर्रचनेचा व्हिडीओ आहे.

rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?

इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत…

हेही वाचा…Bangladesh Viral Video: ‘धर्म स्वीकार नाही तर…’ बांगलादेश सोडण्यासाठी हिंदू महिलेला केलं प्रवृत्त? पाहा नेमकं काय घडलं?

तपास :

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ ( Video) अपलोड केला आणि इमेज सर्च करून तपास सुरू केला.

आम्हाला unilad.com वर एक बातमी सापडली. या बातमीचे शीर्षक होते : “भरकोर्टात सात गोळ्या झाडून बदला घेणारी मुलीची आई”

https://www.unilad.com/news/marianne-bachmeier-courtroom-shooting-891905-20221231

रिपोर्टमध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की, फुटेज पाहिल्यानंतर लोक जर्मनीच्या आईच्या समर्थनार्थ रॅली काढत आहेत.

मारियान बाचमेयरच्या सात वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्या माणसाचे नाव क्लॉस ग्रॅबोव्स्की होते. ३५ वर्षीय ग्रॅबोव्स्की पश्चिम जर्मनीतील ल्युबेक येथे मारियान बाचमेयरच्या शेजारी राहत होता आणि कसाई म्हणून काम करीत होता. मारियान बाचमेयरच्या पतीने पोलिसांना बोलावल्यानंतर ग्रॅबोव्स्कीला अटक करण्यात आली आणि त्याने सात वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. क्लॉस ग्रॅबोव्स्कीने सात वर्षीय मुलीचा गळा आवळून तिच्या मृतदेहाची कालव्याजवळ पुठ्ठ्याच्या पेटीद्वारे विल्हेवाट लावण्यापूर्वी तासन् तास आपल्या घरात ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार केला हा आरोप त्याने मान्य केला नाही. पण, ग्रॅबोव्स्कीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे असे पूर्वीच्या रेकॉर्डमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मार्च १९८१ मध्ये झालेल्या खटल्यादरम्यान, ग्रॅबोव्स्कीच्या बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, आरोपीच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता. त्यामुळे खटल्याच्या तिसऱ्या दिवशी मारियान बाचमेयरने 22-कॅलिबर पिस्तूल घेऊन कोर्टात प्रवेश केला आणि ग्रॅबोव्स्कीवर गोळ्या झाडल्या; ज्यात त्याचा मृत्यू झाला. मारियान बाचमेयरच्या कोर्टरूममध्ये बदला घेण्याच्या या कृतीची पुनर्रचना २७ डिसेंबर २०२ रोजी यूट्यूबवरील एका व्हिडीओत झाली आहे. आम्हाला मिम मेहमेट करमनच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेली मूळ क्लिप सापडली.

व्हिडीओचे शीर्षक होते : Marianne Bachmeier : “I did it for you, Anna.” व्हिडीओला आतापर्यंत ७.७ दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत आणि तो २७ डिसेंबर २०२२ रोजी अपलोड करण्यात आला होता.

आम्हाला २ मार्च १९८३ पासून यूपीआय अर्काइव्हजमध्ये प्रकरणाचा तपशीलदेखील सापडला.

https://www.upi.com/Archives/1983/03/02/A-woman-who-walked-into-a-courtroom-and-fired/4256415429200/

तसेच अहवालात म्हटले आहे की, आपल्या सात वर्षांच्या मुलीची हत्या, बाल विनयभंग केल्याप्रकरणी महिलेने कोर्टात जाऊन आरोपीवर सात गोळ्या झाडल्या आणि पश्चिम जर्मनीच्या न्यायालयाने महिलेला सहा वर्षांची शिक्षा सुनावली.

असेच हुबेहूब व्हिज्युअल जर्मन चित्रपट ‘नो टाइम फॉर टियर्स’मधून घेतले गेले होते.

आम्हाला नऊ वर्षांपूर्वी सिल्व्हिया श्मीबर या यूट्यूब चॅनेलने अपलोड केलेला संपूर्ण चित्रपट सापडला.

व्हिडीओमध्ये सुमारे एक तास १९ मिनिटांचे व्हायरल व्हिडीओसारखे दृश्य दिसते आहे.

व्हिडीओचे शीर्षक होते (अनुवाद) : मारियान बाचमेयर केस : नो टाइम फॉर टियर्स

निष्कर्ष : ‘नो टाइम फॉर टीयर्स’ या जुन्या जर्मन चित्रपटातील पुनर्रचनेचा व्हिडीओ वास्तविक घटनेचे दृश्य म्हणून व्हायरल होतो आहे. हे आमच्या तपासातून उघड होत आहे.