आयुष्यात कोणतंही सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग मात्र आणता येत नाही असं आपण नेहमीच घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडून ऐकत आलो आहोत. पण काळ बदलला आहे, त्यामुळे कसलंही सोंग आणता येणं आता शक्य आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हल्ली सोशल मीडियावर प्रत्येकाला चमकायचं असतं. पण अर्थात या सगळ्यासाठी पैसे हवेच ना! या समस्येवर रशियातल्या एक कंपनीने एक वेगळाच तोडगा काढला आहे.
Video : विश्वविक्रमासाठी कायपण! त्याने तोंडात पेटत्या मेणबत्त्या ठेवल्या
रशियामधली प्रायव्हेट जेट स्टुडिओ नावाची कंपनी आहे. ही कंपनी शोऑफ करण्यासाठी ग्राहकांना चक्क कमी दरात जेट भाड्याने देते. हल्ली इन्स्टाग्रामवर प्रायव्हेट जेटसोबत फोटोशूट करून ते अपलोड करण्याचा ट्रेंड आलाय. असा दिखावा केला की, फॉलोवर्स देखील वाढतात. तेव्हा तरूण पिढीची ही दुखती नस ओळखून ही कंपनी शोऑफ करण्यासाठी ग्राहकांना प्लेन किंवा जेट भाड्यानं देते. हा दरही इतका कमी आहे की अनेक जण जेट भाड्यानं घेऊन फोटोशूट करतात. फोटोशूट करण्यासाठी एक फोटोग्राफरही कंपनीकडून देण्यात येतो. अडीच तासासाठी भारतीय रुपयाप्रमाणे १६ हजारांच्या आसपास रक्कम मोजावी लागते, त्यामुळे ग्राहकांची तुफान प्रसिद्धी या संकल्पनेला लाभली आहे.