सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ खूप थक्क करणारे असतात. असे व्हिडीओ पाहून देशात सुरक्षितता आहे की आहे यावरदेखील प्रश्न पडतो. सध्या अशीच काहीशी घटना एका मुलीबरोबर घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतेय, या व्हिडीओत एक मुलगी एक मोठी फसवणूक होण्यापासून बचावली.

तरुणीचा व्हायरल व्हिडीओ

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या धक्कादायक व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगी रिक्षात बसलेली दिसतेय. पण अचानक त्या रिक्षात एक माणूसदेखील चढतो. तो पोलीस अधिकारी असल्याचं त्या मुलीला सांगतो. घुसखोरी करत तो मुलगीकडे वेप वापरण्यावरून ५० हजाराची मागणी करतो. यावर मुलीला संशय येतो आणि ती त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरूवात करते.

या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “मी सध्या MIDC च्या सेंट्रल रोडजवळ आहे आणि मी ६६८७ या नंबरप्लेट असणाऱ्या रिक्षात बसली आहे. या माणसाने मला मधल्या रस्त्यातच थांबवलं आणि तो जबरदस्तीने रिक्षात बसला. तो मला पवई पोलीस चौकीत घेऊन चालला आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याशिवाय तो मला इथून घेऊन जाऊ शकत नाहीस. “

तेवढ्यात बनावट पोलीस अधिकारी असलेला माणूस रिक्षा थांबवतो आणि रिक्षातून खाली उतरतो. यावर ती म्हणते, “मी व्हिडीओ रेकॉर्ड करतेय म्हणून घाबरून तो खाली उतरला.”

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडीओ @lafdavlog या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बनावट पोलिसाने वेपच्या वापरासाठी मुलीला फसवण्याचा प्रयत्न केला, ५० हजार रुपयांची केली मागणी” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ४ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरन्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

तरुणीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आशा आहे की तिने पोलिसात तक्रार दाखल केली असेल” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तो रिक्षाचालकदेखील यात सामील असेल असं वाटतंय” तर एकाने ” शाब्बास… भारताला तुमच्यासारख्या धाडसी मुलींची गरज आहे” अशी कमेंट केली.

Story img Loader