शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे संपूर्ण प्रदेशात हादरे बसले, बँकॉकपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. हे हादरे इतके जोरदार होते की एक पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पुलचे एका धबधब्यात रूपांतरित झाले. मध्य बँकॉकमधील लक्झरी कलेक्शन प्रतिष्ठान असलेल्या अथेनी हॉटेलमधील ही अद्भुत घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. उंच इमारतीच्या छतावरून पाणी धबधब्याप्रमाणे खाली कोसळत असल्याचा आभास निर्माण होत आहे. हे दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींना डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. भुंकपाच्या जोरदार कंपनांमुळे इमारतीला हादरे बसले त्यामुळे हॉटेलच्या छतावरील पूल हलला आणि पाणी पाण्याच्या प्रवाहासारखे खाली कोसळल्याचे सांगितले जात आहे.

उंच इमारतीच्या छतावर अडकले कुटुंब

दरम्यान आता बँकॉकमधील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका उंच इमारतीच्या छतावर एक कुटंब अडकले आहे आणि छतावर असलेला स्विमिंगपुल समुद्राप्रमाणे खवळल्यासारखा दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कोरिअन कुटुंबासह काही लोक उंच इमारतीच्या छतावर अडकलेले आहे. काचेच्या दारावजावर स्विंमिग पुलमधील पाण्याच्या लाटा जोरात येऊन आदळत आहे. कोरिअन कुटुंबसर असलेला हा चिमुकला जोर जोरात रडत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा निर्माण झाला आहे.

कुटुंब सुरक्षित

म्यानमारमध्ये आलेल्या ७.७ आणि ६.४ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपांमुळे इमारत हादरली असताना हे कुटुंब छतावर अडकलेले दिसते आहे. पण एका फॉलो-अप पोस्टमध्ये, वापरकर्त्याने सर्वांना आश्वासन दिले की,”त्यांच्या लहान मुलासह कोरियन कुटुंब सुरक्षित आहे.” आम्ही ३१ व्या मजल्यावरून खाली आलो आहोत. लहान मुलगाही ठीक आहे. ते खूप धाडसी आहेत, आम्हाला पायऱ्या चढाव्या लागल्या तरीही त्यांनी अजिबात गोंधळ केला नाही,” असे वापरकर्त्याने पोस्ट केले.

बँकॉकमध्ये भुंकपाचे बसले हादरे

भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की बँकॉकमधील अनेक इमारती आणि उंच इमारती हादरल्या होत्या, एका व्हिडिओमध्ये भयानक दृश्य दाखवण्यात आले आहे. बँकॉकमधील गोंधळलेल्या दृश्यांव्यतिरिक्त, शहरातील सरकारी कार्यालयांसाठी बांधकाम सुरू असलेली ३० मजली गगनचुंबी इमारत कोसळली, ज्यामध्ये ४३ कामगार अडकले, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. भूकंपाचे केंद्र मध्य म्यानमारमधील मोन्यवा शहरापासून सुमारे ५० किलोमीटर पूर्वेला होते.