Viral Video: नव्या प्रेमाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा अनेक प्रेमी ते प्रेम आयुष्यभर निभावण्याचे वचन एकमेकांना देतात, पण पुढे जाऊन अनेकदा हे वचन अपूर्णच राहते. बऱ्याचदा यात दोघांचीही चुकी असते किंवा दोघांतील एकाची चुकी असते. आपण अनेकदा पाहिलं असेल, जेव्हा एखाद्याचा ब्रेकअप होतो तेव्हा ती व्यक्ती खूप भावूक होते. असे प्रेमभंगाचे अनेक किस्से आपण अनेकदा ऐकलेच असतील. अशातच एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे, ज्यात एका तरुणीने आपल्या जोडीदारासोबत ब्रेकअप केला असून तिचे कुटुंबीय त्याचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी विमानातील एक व्हिडीओ खूप चर्चेत आला होता, ज्यात एका पायलटने त्याची सहकर्मचारी असलेल्या तरुणीला प्रवाशांसमोर लग्नासाठी प्रपोज केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. शिवाय आणखी असाच एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात एका वृद्ध व्यक्तीने त्याच्या पत्नीला वाढदिवसाचे सरप्राइज म्हणून एक हटके गिफ्ट दिले होते. प्रेमाची खरी व्याख्या सांगणारे हे दोन्ही व्हिडीओ खूप चर्चेत होते. दरम्यान, आता चक्क ब्रेकअपचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटले.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Heart-Melting Video
VIDEO : पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं! तरुणाने सादर केली प्रेमावरची कविता; म्हणाला,”एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा पडता येत नाही” VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
a young guy Caught Sleeping in Theater
चित्रपट संपला, लोक घरी परत जात होते, पण तरुण मात्र गाढ झोपलेला; थिएटरमधील VIDEO होतोय व्हायरल

हा व्हायरल व्हिडीओ X (ट्विटर) वरील @FadeHubb या अकाउंटवर शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी तिच्या कुटुंबीयांसोबत हॉटेलमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी ती व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला तिचा फोन दाखवते, ज्यात ती तिच्या प्रियकराला ब्रेकअप करत असल्याचा खूप मोठा मेसेज पाठवण्याच्या तयारीत असते. ज्यावेळी ती तो मेसेज सेंड करते, त्यावेळी कुटुंबातील सर्व जण मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागतात. या व्हायरल व्हिडीओवर, “जेव्हा तुमचे कुटुंबीय तुमचा ब्रेकअप साजरा करतात…” असं लिहिण्यात आलं आहे. शिवाय या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “संपूर्ण कुटुंब ब्रेकअपचा आनंद साजरा करत आहे”, असं लिहिलं आहे.

हेही वाचा: हीच खरी माणुसकी! भटक्या गायींना स्वतःच्या हाताने भरवली पोळी; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “तू कलियुगातला देव”

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून ३० हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. या व्हिडीओवर अनेक जण विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलंय की, “त्या मुलाचेही अभिनंदन करा, अशा मुलीपासून सुटका झाली.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “किती वाईट वाटलं असेल त्या मुलाला.” तर एका व्यक्तीने लिहिलंय की, “कोणाला जबरदस्ती नात्यात बांधण्यापेक्षा सोडून दिलेलं बरं”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “हिचे कुटुंबीय खूप सपोर्टिंग आहेत”, अशा प्रकारे सोशल मीडियावर युजर्स मुलीच्या निर्णयाला पाठिंबा देताना दिसत आहेत; तर काही जण तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

Story img Loader