नवीन वर्ष सुरू झालं आहे. या नववर्षात अनेकांचा एक ठरलेला संकल्प असतो. तो म्हणजे वजन घटवणं, फिट राहणं वगैरे वगैरे. सगळेच नव्या उत्साहात वजन घटवायला सुरूवात करतात पण, नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसं दहा एक दिवस उलटले की सगळ्यातला उत्साह निघून जातो. अशावेळी तुम्ही चीनमधल्या या कुटुंबाकडून नक्कीच प्रेरणा घ्या. या कुटुंबातील सासू सून, मुलगा आणि सासरे या चौघांनी सहा महिन्यात वजन घटवलं. या चौघांच्या शरीरात वजन घटवल्यानं कमालीचा बदल झाला आहे.

जेसची बायको गर्भवती होती, त्याकाळात तिचं वजन वाढलं होतं, तर त्याच्या आई वडिलांचंदेखील वजन वाढलं होतं. तेव्हा नवा संकल्प म्हणून या कुटुंबानं सहा महिन्यात वजन घटवण्याचा निर्णय घेतला. खाण्यापिण्यावर नियंत्रण, दररोज व्यायाम, चालणं हे करून या कुटुंबानं आपलं वजन घटवलं. या सर्वांनी व्यायाम करायला सुरुवात केल्यापासून प्रत्येक दिवसाचे त्यांचे फोटो स्थानिक छायाचित्रकारानं कॅमेरात टिपले. बरोबर सहा महिन्यांनी या कुटंबात झालेला कमालीचा बदल जेसनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

Story img Loader