Viral Video : सुनील ग्रोवर हे हिन्दी टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. हास्यकलाकार म्हणून सुनील ग्रोवरने एक वेगळं नाव कमावलं आहे. कपिल शर्मा शोमुळे सुनील घराघरामध्ये पोहचला. त्याने अनेक चित्रपटातही काम केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातही त्याने एक चांगली भूमिका केली आहे.
जवान चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि सुनीलची भूमिकाही लोकांना खूप आवडली आहे पण सध्या सुनील सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सुनील रस्त्याच्या कडेला कपडे धुतानाचा हा व्हिडीओ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओ एखाद्या चित्रपटातील नसून सुनीलने स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तो रस्त्याच्या कडेला खाली बसून कपडे धुताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रस्त्याच्या कडेला एक नळ आहे.
या नळाच्या पाण्याने सुनिल कपडे धुताना दिसतोय. तो कपडे धुण्यासाठी बॅटचा सुद्धा उपयोग करत आहे. सुनिलने पांढरे टी-शर्ट आणि शॉर्ट पँट घातली आहे. हा व्हिडीओ एका गावातील असल्याचा दिसून येत आहे.

हेही वाचा : Mumbai Video : मुंबई लोकलमध्ये जपताहेत भजनाची परंपरा, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

सुनीलने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझं आवडतं काम करताना..” या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी सुनीलचे कौतुक केले आहे तर काही युजर्सनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने विचारले, “कपडे धुण्यासाठी कोणता साबण वापरता?” तर एका युजरने लिहिलेय, “जेव्हा माझी आई रागावलेली असते तेव्हा मी पण कपडे धुतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “एवढ्या प्रेमाने कोण कपडे धुतात?”