Viral Video : राज्यातील प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून ओळखली गौतमी पाटील सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आपल्या डान्सनी सर्वांना वेड लावणाऱ्या गौतमीचे लाखो चाहते आहे. सोशल मीडियावर तिचे कधी डान्सचे व्हिडीओ तर कधी घरकाम करतानाचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक अनोखा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये गौतमीचं एक आगळं वेगळं रुप पाहायला मिळालं. व्हिडीओमध्ये गौतमी एका चिमुकलीबरोबर खेळताना दिसत आहे. हा गोंडस व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गौतमी एका छोट्या मुलीबरोबर निवांत बसली आहे. ही चिमुकली तिला एक खेळ शिकवते आणि त्यानंतर दोघीही हा खेळ खेळताना व्हिडीओमध्ये दिसतात. खेळ खेळताना गौतमी या चिमुकलीबरोबर गोड गप्पा मारताना सुद्धा दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही गौतमीच्या आणखी प्रेमात पडाल. नेहमी स्टेजवर डान्स करणारी गौतमी एकीकडे आणि या चिमुकलीबरोबर खेळणारी गौतमी दुसरीकडे, असा लहानांबरोबर लहान होऊन मनसोक्त आनंद लुटणाऱ्या गौतमीचा हा स्वभाव कुणालाही आवडू शकतो.
हेही वाचा : पुरुषांनो, फक्त दहा मिनिटांमध्ये नेसा परफेक्ट धोतर, दिवाळीला करा असा पारंपारिक लूक, पाहा व्हिडीओ
गौतमीने official_gautami941__ या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर “इत्ती सी हंसी, इत्ती सी ख़ुशी, इत्ता सा टुकडा चाँद का” हे गाणं लावलंय. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.