जादुगाराला काहीच अश्यक्य नसतो. कोणत्याही किमया करून तो बघ्यांना थक्क करू शकतो. जगप्रसिद्ध जादुगार डेव्हिजड ब्लेन यांच्याबद्दल असेच बोलता येईल. त्यांच्या ट्रिक्सने आणि जादूच्या कलेने ते सगळ्यांना अचंबित करून सोडतात. त्यामुळे त्यांचे जादूचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दीही खूप जमते. हल्लीच त्यांनी लास वेगासमध्ये बंदुकीतून सुटलेली गोळी तोंडात पकडण्याचा स्ंटट केला पण तो मात्र त्यांच्या जीवावर बेतला.
वाचा : ‘आधार’ने केलेल्या ट्विटचा अर्थ काय बुवा?
बंदुकीतून सुटलेलेली गोळी डेव्हिड यांना तोंडांत पकडायची होती. यासाठी त्यांनी सगळी तयारी केली. आतापर्यंत एखाद्या चित्रपटात काऊ बॉय बंदुकीची हवेत सुटलेली गोळी तोंडात पकडून फेकून दिलेली तुम्ही पाहिली असेच. एवढ लांबच उदाहरण कशाला आपल्या अनेक चित्रपटात रजनीकांत बंदुकीतून सुटलेली गोळी कधी तोंडात तर कधी हातात पकडून फेकून देतात. पण हे सारे झाले सिनेमात. प्रत्यक्षात मात्र हे पाहण्याचा योग येणे तसे दुर्मिळच म्हणून डेव्हिड यांनी असा स्ंटट करायचा ठरवाला. आता खुद्द डेव्हिड हा स्ंटट करणार म्हणजे गर्दी तर होणारच. पण त्यादिवशी डेव्हिड यांचे दुर्दैव हा प्रयोग पुरता फसला. बंदुकीच्या गोळीमुळे दातांना कोणाही इजा होऊ नये यासाठी डेव्हिड यांनी दांतावर कॅप चढवली. अन् समोर ठेवलेल्या बंदुकीचा चाप दोरीने ओढला त्याचबरोबर गोळी सुटली. डेव्हिडने ती आपल्या तोंडात पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तीव्र झटका बसला. पाठीतून डोक्यात आणि घशात कळ गेली. त्यामुळे तीव्र वेदनेने डेव्हिड कळवळायला लागले.
वाचा : नववर्षातील पहिल्या ट्यूना माशावर चक्क ४ कोटींची बोली!
डेव्हिड यांना नंतर उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. २०१० मध्ये त्यांनी तोंडात बंदुकीची गोळी पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. २० हजार प्रेक्षकांसमोर त्यांनी हा स्टंट केला होता. त्यामुळे सगळेच पुन्हा एकदा ही जादू अनुभवायला आले होते पण त्यांच्या पदरी मात्र निराशाच आली.