Famous Singer AP Dhillon Controversial Shoes: पंजाबी-कॅनेडियन गायक एपी ढिल्लॉनने बनिता संधूच्या “विथ यू” या नवीन गाण्याच्या प्रमोशन दरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोजमधील ढिल्लॉनचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ढिल्लॉनच्या शूजमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ट्विटर वापरकर्त्यांनी ढिल्लॉनच्या तिरंगी शूजवर टीका केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्याच मुहूर्तावर अशाप्रकारे राष्ट्रध्वजाचा अपमान करणे हे लज्जास्पद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ढिल्लॉन याने त्याच्या नवीन गाण्याच्या जाहिरातीसाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात तो आणि बनिता किस करताना दिसत आहेत, परंतु इथे लक्ष पटकन त्याच्या शूजकडे वेधले जाते. तुम्ही बघू शकता या शूजवर राष्ट्रध्वजाच्या रंगांची डिझाईन आहे. यावर अनेक चाहत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर त्याला थेट देशद्रोही म्हटले आहे तर काहींनी राष्ट्रध्वजाच्या रंगाचे वेष परिधान करण्याबाबतचे नियमच शेअर केले आहेत. एपी ढिल्लॉनची ही वादग्रस्त पोस्ट काय होती आणि त्यावर नेटकऱ्यांच्या कशा प्रतिक्रिया उमटत आहेत हे पाहूया..

हे ही वाचा<< ‘गदर २’ सुरु असताना ‘मोदी जिंदाबाद’, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांमुळे तुफान हाणामारी, नेमकं घडलं काय?

एपी ढिल्लॉन सध्या त्यांच्या आगामी माहितीपटासाठी भारतात आला आहेत, “एपी ढिल्लॉन : फर्स्ट ऑफ अ काइंड”. गुरुदासपूर ते कॅनडा या त्याच्या प्रवासाची कथा तो अशा प्रकारे आपली शेअर करेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती, असे तो सांगतो. दुसरीकडे, एपी ढिल्लॉन आणि अभिनेत्री बनिता संधूच्या रिलेशनशीपबाबत सुद्धा चाहत्यांमध्ये चर्चा आहे. संधूने २०१८ मध्ये वरुण धवनच्या समोर शूजित सरकारच्या “ऑक्टोबर” चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous singer ap dhillon flag tricolour shoes in kiss video made netizens angry slammed singer calling anti indian khalistani svs