Armaan Malik Viral Video : युट्यूबर अरमान मलिक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रकाशझोतात आला आहे. अरमानच्या दोन्ही बायका गरोदर असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी झळकल्या होत्या. त्याची पत्ती पायल आणि कृतिकाच्या बेबी शॉवरचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. असं असतानाच आता पुन्हा एकदा अरमान मलिकच्या नव्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जिममध्ये एका तरुणीसोबत फिटनेस ट्रेनिंग देनाताचा अरमानचा व्हिडीओ समोर आला आहे. मेघा देवरानी असं या तरुणीचं नाव आहे. जिममधील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा अरमानची खिल्ली उडवली आहे. या तरुणीसोबतही अरमान डेट करतोय का? ही तरुणी अरमानची तिसरी बायको आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला असून या व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याआधीही अरमानने नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याच्या दोन गरोदर पत्तींना अरमानने मारहाण केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. बेबी शॉवरच्या कार्यक्रमाआधी पायल आणि कतिका अरमानशी वाद विवाद करत असल्याच्या त्या व्हिडीओतून समोर आलं होतं. त्यांच्यात जोरदार भांडण झाल्याने अरमानने त्याच्या दोन्ही पत्नींना मारहाण केली होती. पण त्यांनी हे भांडण खरं नसून एक विनोद असल्याचं व्हिडीओच्या शेवटी त्यांनी नेटकऱ्यांना सांगितलं.

अरमान मलिक कोण आहे?

इथे पाहा व्हिडीओ

हैद्राबाद येथील अरमान मलिकची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय राहून त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. अरमानने पायलशी २०११ मध्ये लग्न केलं. त्यांना एक मुलगा असून चिरायु मलिक असं त्याचं नाव आहे. त्यानंतर अरमानने कृतिकाशी लग्नगाठ बांधली. कृतिका त्याची पत्ती पायलची मैत्रिण असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, प्रसिद्ध गायक अरमान मलिक यांनी नुकतंच एक ट्वीट करुन युट्युबर अरमान मलिकला खडेबोल सुनावले. हा युट्यूबर सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. त्याचं खरं नवा संदीप आहे. त्याला अरमान मलिक म्हणू नका. माझ्या नावाचा खूप दुरुपयोग केला गेला. गेल्या काही दिवसापासून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, त्या वाचून खूप वाईट वाटतं.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous you tuber armaan malik with a new woman in the gym video clip viral on internet netizens gives shocking comments nss