बॉलिवूड अभिनेता सोनू सूद करोना काळात लाखो लोकांसाठी प्रेरणा देणारा ठरला. त्याने त्यावेळी बऱ्याच लोकांना मदत केली होती. त्यानंतर तो भारताचे खरा सुपरस्टार बनला. सोशल मीडियावर त्याची जोरदार फॅन फॉलोइंग आहे. त्याचे चाहते त्याच्यासाठी अनेकदा काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी, सोनू त्याच्या चाहत्यांच्या प्रयत्नांचे कौतुक देखील करतो.

सोनूचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक सिम कार्ड आहे, ज्यावर सोनूचे पेंटिंग बनवले आहे. सांगितले जात आहे की सोनूच्या फॅनने हे पेंटिंग बनवले आहे. सोमिन नावाच्या त्याच्या एका चाहत्याने हे चित्र त्याला समर्पित केले आहे, त्याने सोनू सूदलाही या फोटोसह टॅग केले आहे. त्यानंतर अभिनेत्याने लगेच ते रिट्विट केले.

career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
docudrama Mai, documentaries, documentary,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
documentary making, Abhijit Kolhatkar, Shilpa Godbole, producer director duo, documentary, Urdu ghazal, Shashikala Shirgopikar, Reverb Production, passion project, artistic journey
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…
labor camps, documentary, labor,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : ‘ठिय्या’ मांडणी…
mollywood actress rape marathi news
अन्वयार्थ: रुपेरी पडद्यावर बलात्काराचे डाग

हा फोटो शेअर करताना, सोनूच्या फॅन सोमिनने लिहिले, सोनू सूदचा फोटो सिमवर आणि सोनू सूदलाही टॅग केले. थोड्याच वेळात, सोनू सूदने त्यावर एक मजेदार केमेंट देखील केली.सोनू सूदनेही ही पोस्ट रिट्विट केली आणि लिहिले, फ्री १० जी नेटवर्क. आतापर्यंत १२ हजारापर्यंत लोकांना ही पोस्ट आवडली आहे. त्याचबरोबर अनेक चाहते त्यावर मजेदार कमेंटही करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘मदत करण्यासाठी तुमचे नेटवर्क सर जी पेक्षा अधिक आहे’, दुसऱ्याने लिहिले, तुमचे नेटवर्क संपूर्ण जगात सर्वात वेगवान आहे.’

कोरोनाच्या काळात, जेव्हा लोक मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचले होते आणि ऑक्सिजन, औषधांसाठी इकडे -तिकडे भटकत होते, तेव्हा सोनू सूद त्यांच्यासाठी उभा होता आणि त्याने देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाला मदत केली होती. सोनू सूदच्या या कामाचे खूप कौतुक झाले.