Student Sing Fandry Movie Song : शाळा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातीक एक सुंदर आठवण. जिथे रडलो, धडपडलो, शिक्षकांचा ओरडाही खाल्ला. पण, खूप चांगल्या गोष्टी शिकून शाळेबाहेर पडलो. शाळेत मागच्या बाकावर बसणार विद्यार्थ्यांचा एक ग्रुप ठरलेला असायचा ज्यांना आपण आता बॅक बेंचर्स असे म्हणतो. तर हे बॅक बेंचर्स अनेकदा शिक्षक शिकवून वर्गाबाहेर पडले की तर कधी मधल्या सुट्टीत विद्यार्थी बसणाऱ्या बाकांचा उपयोग करून गाणी म्हणायचे, बँजो वाजवायचे ; हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; यामध्ये एका विद्यार्थ्याने बाकाच्या तालावर जबरदस्त गाणं सादर केलं आहे.

व्हायरल व्हिडीओ शाळेतील आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला नागराज मंजुळे यांचा ‘फॅण्ड्री’ चित्रपट बराच गाजला. चित्रपटाच्या कथेबरोबरच त्यातील एक गाणं अनेकांना ताल धरायला भाग पाडणारं होतं. हे गाणं म्हणजे संगीतकार अजय-अतुल यांनी गायलेलं ‘तुज्या पिरतीचा इंचू मला चावला.’ तर आज याच गाण्याला एका शाळकरी मुलाने गाऊन दाखवलं आहे. ‘तुज्या पिरतीचा इंचू मला चावला’ हे गाणं बाकाच्या तालावर विद्यार्थ्याने कसं सादर केलं एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…VIRAL VIDEO: कार, बससह इतर वाहने चालविणाऱ्या ७३ वर्षीय राधामणी आजी; ‘तिचे’ ड्रायव्हिंग कौशल्य पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस

व्हिडीओ नक्की बघा…

बाकाच्या तालावर सादर केलं फॅण्ड्री चित्रपटातील गाणं:

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, विद्यार्थ्याने गाणं सादर करण्यासाठी कोणत्याही उपकरणांचा येथे वापर केलेला नाही. फक्त शाळेतील बाकाच्या तालावर याने गाणं सादर करण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्याने या गाण्यातील गायलेली एक-एक ओळ, यादरम्यान त्याचे हावभाव, त्याचे ताल, सूर ऐकून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल आणि हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल. तसेच या गाण्याला साथ देणाऱ्या मित्राचेही कौतुक करावं तेवढं कमीच आहे, असं म्हणायला हरकत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shemannwadi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘शाळेतील बँजो ग्रुप’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे अनोखे टॅलेंट पाहून नेटकरीसुद्धा कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही. काही जणांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या शाळेचे दिवस आठवले आहेत, तर काही जण हे रिअल टॅलेंट आहे आदी कमेंट करताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने युजर्सना पुन्हा शाळेत नेले आहे.

Story img Loader