टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. नुकतीच त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रीया करण्यात आली. मात्र हार्दिकने अशा परिस्थितीतही नेटकऱ्यांचा रोष आपल्यावर ओढवून घेतला आहे. ७ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खानने आपल्या वयाची ४१ वर्ष पूर्ण केली. या दिवशी झहीर खानच्या सर्व चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मात्र हार्दिक पांड्याने आपल्या जुन्या सामन्यात झहीर खानच्या गोलंदाजीवर षटकार मारतानाचा व्हिडीओ पोस्ट करत झहीरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

हार्दिक पांड्याचं हे ट्विट नेटकऱ्यांना अजिबात रुचलं नाही. नेटीझन्सनी यानंतर हार्दिक पांड्याची चांगलीच खरडपट्टी काढली.

यानंतर झहीर खाननेही पांड्याचे आभार मानत आपल्या खास शैलीत हार्दिकला सडेतोड उत्तर दिलं आहे.

पाठीला झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक उरलेलं वर्ष क्रिकेट खेळू शकणार नाहीये. सध्या तो शस्त्रक्रियेमधून सावरण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हार्दिक भारतीय संघात कधी पुनरागमन करतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader