इंटरनेटच्या जगात सोशल मीडियावर कधी कोणत्या मजेशीर गोष्टी पाहायला मिळतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. सध्या सोशल मीडियावर दोन मधमाशांच्या व्हिडीओने खळबळ माजवली आहे. खरं तर, व्हायरल क्लिपमध्ये दोन मधमाशांनी असे काही केले आहे की इंटरनेटवरचे लोक थक्क झाले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मधमाश्या एकत्र फँटाची बाटली उघडताना दिसत आहेत. होय, हे खरंय. हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत. तुम्हीही जर या मधमाश्यांचा व्हिडीओ पाहिला नसेल तर एकदा पहाच.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची सुरुवात फॅंटाच्या छोट्या बाटलीपासून होते. आपण पाहू शकता की बाटलीची झाकण बंद आहे आणि त्याभोवती दोन मधमाश्या गुंजत आहेत. पण पुढच्या क्षणी जे काही घडेल ते पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. दोन्ही मधमाश्या मिळून बाटलीचे झाकण उघडतात. होय, तुम्ही ते अगदी बरोबर वाचले आहे. जर तुम्हाला आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्हीच हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पहा.
( हे ही वाचा: VIDEO: दहीहंडी फोडायला चढलेल्या ‘गोविंदा’चा सातव्या थरावरून पडून मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाली धक्कादायक घटना)
मधमाश्यांनी फॅंटाची बॉटल कशी उघडली ते एकदा पहाच
( हे ही वाचा: Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेने केली चप्पलेने मारहाण; व्हिडीओ झाला व्हायरल)
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर puddlehumour नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला आतापर्यंत १२.५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, टीमवर्क नीट केले तर स्वप्नही पूर्ण होते. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे, फॅंटासाठी काहीही करतील. एकूणच, मधमाशांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.