Beed Retirement Day viral video: एकाच आयुष्याची “सेकंड इंनिंग” म्हणजे सेवानिवृत्ती. सेवा निवृत्त झालेला मनुष्य जरी त्याच्या सेवेतून मुक्त झाला असला तरीही आयुष्याची फर्स्ट इंनिंग खेळल्याणानंतर सेकंड इंनिंग फार महत्वाची असते.सेकंड इंनिंगमध्ये रन किती काढावे हे जरी फिक्स असले तरी खेळावे फर्स्ट इंनिंग पासूनच लागते.आयुष्यभर सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्ती हा हक्काचा दिवस येतोच. ज्या सेवेच्या बदल्यात इतकी वर्षे आपण आपले कुटुंब चालवले मुलं लहानाचे मोठे केले त्याच सेवेतून निवृत्त होणे म्हणजे काळजाचे पाणीच होणे आहेच. असाच एक व्हिडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेवानिवृतीच्या दिवशी एका बस ड्रायव्हारला त्यांच्या मुलानेचं अक्षरश: खांद्यावर घेतलंय.
भावनिक आणि तितकाच अभिमानाचा क्षण
जसं-जसं वडिलांचं वय वाढतं जातं, तसं घरातली तरूण मंडळी त्यांच्यावरचा भार आपल्या खांद्यावर घेतात. एखाद्या कुटुंबातली मुलगा जेव्हा घरात वडिलांकडून जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो, तेव्हा वडिलांना नक्कीच हायसं वाटतं. इतकेच नव्हे तर त्या वडिलांना आपल्या लेकाचा अभिमानही वाटतो. हाच लेक जर कामाच्या ठिकाणी आपल्या वडिलांच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांच्याच कामाचा भार सांभाळायला आला आणि स्वत: तिथे रूजू झाला तर…. असाच एक भावनिक आणि तितकाच अभिमानाचा क्षण नुकताच लोकांना पाहायला मिळाला.
आयुष्यभर लालपरीची सेवा करणाऱ्या या बाप-लेकाचं प्रेम, एका मुलानं आपल्या वडिलांना दिलेला हा निरोप खरचं भारीये. हा इमोशन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ काम केलं. आता त्यांच्या निवृत्तीची वेळ आली. त्यांचा कामाचा शेवटचा दिवस. त्यामुळे जी बस त्यांच्यासोबत सदैव होती, जिच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होत होता, तिचा निरोप घेण्याची वेळ येताच, त्यांना गहिवरून आलं.
बाप-लेक एकाच आगारात
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडिलांचा सेवेचा शेवटचा दिवस असताना मुलानं खास त्याच बस डोपेमध्ये हजेरी लावून वडिलांना थेट खांद्यावर घेत मिरवलं आहे. बाप-लेक एकाच आगारात कार्यरत होते. एसटी चालक बाप ज्या दिवशी निवृत्त होणार होता त्याच दिवशी त्याच्या मुलाला म्हणजे वाहकाला त्याच गाडीवर ड्युटी लावण्यात आली होती. ती संपल्यावर गाडी आगारात आली. मुलाने बापाला फेटा बांधत, गाडीतील उतरायच्या जिन्यातूनच खांद्यावर घेत कार्यालयात निघाला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “ताजमहाल मीसुद्धा बांधला असता पण…” आजोबांची शायरी ऐकून पोट दुखेपर्यंत हसाल; VIDEO होतोय प्रचंड व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही भावूक झाले आहेत. या व्हिडीओवर यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत, यावेळी एकानं या व्हिडीओखाली एक चारोळी लिहीली आहे, “आयुष्याच्या उत्तरार्धात हवी तेवढी करावी मस्ती, समाधान असू द्यावे चित्ती. आयुष्याची तेवत ठेवावी मोमबत्ती, परंतु स्वतःच्या मनमुराद जगण्यातून शेवटपर्यंत कधीही घेऊ नये निवृत्ती”.