Viral video: एकाच आयुष्याची “सेकंड इंनिंग” म्हणजे सेवानिवृत्ती. सेवा निवृत्त झालेला मनुष्य जरी त्याच्या सेवेतून मुक्त झाला असला तरीही आयुष्याची फर्स्ट इंनिंग खेळल्याणानंतर सेकंड इंनिंग फार महत्वाची असते.सेकंड इंनिंगमध्ये रन किती काढावे हे जरी फिक्स असले तरी खेळावे फर्स्ट इंनिंग पासूनच लागते.आयुष्यभर सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्ती हा हक्काचा दिवस येतोच. ज्या सेवेच्या बदल्यात इतकी वर्षे आपण आपले कुटुंब चालवले मुलं लहानाचे मोठे केले त्याच सेवेतून निवृत्त होणे म्हणजे काळजाचे पाणीच होणे आहेच. असाच एक व्हिडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वडिलांच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी मुलानं वडिलांना सुंदर निरोप दिला आहे, यावेळी त्यानं गाडीच्या मागे काय लिहलं एकदा पाहाच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसं-जसं वडिलांचं वय वाढतं जातं, तसं घरातली तरूण मंडळी त्यांच्यावरचा भार आपल्या खांद्यावर घेतात. एखाद्या कुटुंबातली मुलगा जेव्हा घरात वडिलांकडून जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो, तेव्हा वडिलांना नक्कीच हायसं वाटतं. इतकेच नव्हे तर त्या वडिलांना आपल्या लेकाचा अभिमानही वाटतो. याच लेकानं वडील इतके वर्ष जो ट्रक चालवत होते त्या ट्रकच्या मागे सुंदर मेसेज लिहला. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय? तर या मुलानं वडीलांच्या ट्रकच्या मागे वडीलांची शेवटची राईड असा पोस्टर लावला आहे. एकीकडे इतक्या वर्षांनी आता आरामाचे दिवस येणार म्हणून खूश झालेले वडील दुसरीकडे एवढ्या वर्षाच्या आठवणीत भावनीक झाले असतील. ज्या ट्रकमुळे त्यांचा उदरनिर्वाह होत होता, तिचा निरोप घेण्याची वेळ येताच, त्यांच्या भावना काय असतील याची आपण कल्पनाही नाही करु शकत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुलींनो २२ दिवसांचं प्रेम की २२ वर्षांचं बापाचं प्रेम; वयात येणाऱ्या मुलीला प्रत्येक बापानं दाखवावा असा VIDEO; नक्की बघा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही भावूक झाले आहेत. या व्हिडीओवर यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत, यावेळी एकानं या व्हिडीओखाली एक चारोळी लिहीली आहे, “आयुष्याच्या उत्तरार्धात हवी तेवढी करावी मस्ती, समाधान असू द्यावे चित्ती. आयुष्याची तेवत ठेवावी मोमबत्ती, परंतु स्वतःच्या मनमुराद जगण्यातून शेवटपर्यंत कधीही घेऊ नये निवृत्ती”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farewell given by son to father on their last day working message written behind truck video going viral srk