IND vs AUS World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. हा सामना पाहण्यासाठी देशभरातील लोक आतूर झाले आहेत. खरं तर, भारतीयांना क्रिकेटच किती वेड आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण आजचा हा फायनल सामना पाहण्यासाठी लोकांनी आठवडाभर आधीच प्लॅनिंग केल्याचं आपण पाहिलं आहे. या संबंधित अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होती. अशातच आता फरिदाबादमधील एका घटनेमुळे भारतात क्रिकेटची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे याचं उदाहरण पाहायला मिळत आहे. हो कारण येथील एका शाळेतील ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विश्वचषक २०२३ चा फायनल सामन्यासाठी पुढे ढकलली आहे. तर ही घटना समजताच अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फरीदाबादमधील डीएवी पब्लिक स्कूलने भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय विश्वचषक २०२३ फायनलमुळे इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी युनिट टेस्ट पुढे ढकलली आहे. शाळेने यासाठी काढलेल्या आदेशाच्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
The New Zealand team defeated the Indian team in the test match sport news
सपशेल अपयशाची नामुष्की; फिरकीपुढे भारताची पुन्हा दाणादाण
Ball tampering by India A players during the match against Australia A test match sports
भारत ‘अ’ संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचे आरोप!
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?

एका नेटकऱ्याने या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘क्रिकेट हा भारतातील एक सण आहे,’ तर दुसऱ्याने लिहिलं, “हीच खरी क्रिकेटची क्रेझ आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “शाळा व्यवस्थापनाला सलाम.” तर काही नेटकऱ्यांनी शाळेचा मुख्याध्यापक क्रिकेटचा मोठा चाहता असू शकतो असं लिहिलं आहे. शाळेच्या या आदेशाचा फोटो एक्स (ट्विटर) वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याखालील मजेशीर कमेंट वाचून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.