IND vs AUS World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. हा सामना पाहण्यासाठी देशभरातील लोक आतूर झाले आहेत. खरं तर, भारतीयांना क्रिकेटच किती वेड आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण आजचा हा फायनल सामना पाहण्यासाठी लोकांनी आठवडाभर आधीच प्लॅनिंग केल्याचं आपण पाहिलं आहे. या संबंधित अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होती. अशातच आता फरिदाबादमधील एका घटनेमुळे भारतात क्रिकेटची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे याचं उदाहरण पाहायला मिळत आहे. हो कारण येथील एका शाळेतील ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विश्वचषक २०२३ चा फायनल सामन्यासाठी पुढे ढकलली आहे. तर ही घटना समजताच अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
क्रिकेटची क्रेझ! IND vs AUS फायनलसाठी शाळेने युनिट टेस्ट ढकलली पुढे, व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
फरिदाबादमधील एका घटनेमुळे भारतात क्रिकेटची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे, याचं उदाहरण पाहायला मिळत आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-11-2023 at 16:49 IST
TOPICSक्रिकेटCricketक्रिकेट विश्वचषक २०२३Cricket World Cupट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faridabad school postpones unit test citing odi ind vs aus final world cup match 2023 photo viral on social media jap